व्यसनाधीन भावाची डोक्यात फरशी टाकून केली हत्या, कुर्ल्यातील धक्कादायक प्रकार

आई त्याला पैसे देत नव्हती. त्यावरून त्याने आईलाच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. इतकचं काय तर पैशांसाठी तो स्वत:च्या आईवर धावून गेला.

व्यसनाधीन भावाची डोक्यात फरशी टाकून केली हत्या, कुर्ल्यातील धक्कादायक प्रकार
SHARES

दारूच्या आधीन गेलेल्या भावाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून कुर्ल्यात लहान भावाने मोठया भावाची डोक्यात फरशी टाकून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. अजय प्रेमशंकर गुप्ता असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात प्रतिक प्रेमशंकर गुप्ता याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- देवेंद्र फडणवीस यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

कुर्लाच्या सयाजी पगारे चाळ, बुद्धविहारच्या मागे, सीएसटी रोडवर गुप्ता कुटुंब रहात  होते. छोटा मोठा व्यवसाय करून गुप्ता कुटुंबिय त्यांचा उदर निर्वाह करत होते. मात्र गुप्ता कुटुंबातील अजय हा वाईट संगतीला लागला होता. त्यातून त्याला दारू पिण्याची सवय लागली. सतत नशेत राहणारा अजय दारू पिण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी वारंवार घरात भांडण करायचा. त्याच्यारोजच्या या त्रासाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कंटाळली होती. मंगळवारी रात्री देखील अजय दारू पिण्यासाठी त्याच्या आईकडे पैसे मागू लागला. मात्र त्याची आई त्याला पैसे देत नव्हती. त्यावरून त्याने आईलाच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. इतकचं काय तर पैशांसाठी तो स्वत:च्या आईवर धावून गेला.

हेही वाचाः- IPL 2020 'प्ले-ऑफ'चं वेळापत्रक; 'या' दिवशी होणार सामने

त्यावेळी लहान भाऊ प्रतिकने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता. अजयने त्याला देखील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याचा राग अनावर झाल्याने प्रतिकने जवळच पडलेली फरशी अजयच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रतिकला ३०२ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.      

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा