चेंबूरमध्ये मुलावर अनैसर्गिक अत्याचार, सख्ख्या भावांवर गुन्हा


चेंबूरमध्ये मुलावर अनैसर्गिक अत्याचार, सख्ख्या भावांवर गुन्हा
SHARES

चेंबूर परिसरात १९ वर्षीय मुलाच्या असहाय्यतेचा फायदा घेत, धमकावून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या दोन सख्ख्या भावांवर नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. कौकेन शकील अहमद अन्सारी (३२), मोहम्मद कौसेन शकील अहमद अन्यारी (३०) अशी या दोघांची नावे अाहेत. या प्रकरणी मुलाची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी कौसेन याला अटक केली. तर कौकेन अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


जीवे मारण्याची धमकी 

चेंबूरच्या नाईकनगर परिसरात पीडित मुलगा मूळचा उत्तरप्रदेशच्या कानपूरचा रहिवाशी आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने पैसे कमवण्यासाठी तो मुंबईला बहिणीकडे आला होता. त्याच्या बहिणीचा परिसरातच चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. याच परिसरात कौकेन आणि कौसेन यांचा चप्पल बनवण्याचा कारखाना आहे. पीडित मुलाची बहिणी मागील अनेक महिन्यांपासून या दोघांच्या कारखान्यातून विक्रीसाठी चपला घेत आहे.

४ जून रोजी बहिणीच्या घरी पाहुणे आले होते. ते रात्री घरीच थांबणार असल्याने घरात झोपण्यास अडचण होत होती. त्यामुळे बहिणीने कौकेन याच्या कारखान्यावर भावाला झोपण्यासाठी पाठवलं. पहाटे कौकेन आणि कौसेनने दमदाटी करून या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. मुलाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी त्याला मारहाण करत बांधून ठेवून अत्याचार केले. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास त्याला जीवे  मारण्याचीही धमकी त्यांनी दिली. 


बहिणीने केली तक्रार 

घटनेच्या दुसऱ्या दिवशी पिडीत मुलाने कौकेन आणि कौसेन यांनी केलेल्या अत्याचाराबाबत बहिणीला सांगितलं. त्यानंतर जाब विचरण्यासाठी गेलेल्या मुलाच्या बहिणीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. या प्रकरणी पीडित मुलाच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार नेहरूनगर पोलिसांनी दोन्ही भावंडावर ३७७, ३२३,५०६, ३४ या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला.हेही वाचा -

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या 'या' हस्तकाला अटक

वांद्र्यात एकाच कुटुंबातील ४ जणांची आत्महत्या 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा