मुक्या प्राण्यांसाठी मानवी साखळी


SHARES

गिरगाव चौपाटी - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पीसीए संस्थेने मानवी साखळीचे आयोजन केले होते. गिरगाव चौपाटी ते मरिन ड्राईव्ह परिसरात या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पीसीए कायद्यात बदल करावा अशी मागणी करण्यात आली. प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला पाहिजे असे मत प्राणीमित्रांनी व्यक्त केले. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, जल्लीकट्टूसाठी होणारं आंदोलन आणि मानवी वस्तीत शिरणारे जंगली प्राणी हे प्रश्न सध्या ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात स्पेससारख्या संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा