झाकीर नाईकची संपत्ती जप्त करण्याचे आदेश


झाकीर नाईकची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
SHARES

राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)च्या विशेष न्यायालयाने वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक याच्या ४ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने हे आदेश दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत दिले आहेत.

झाकीर नाईकवर २०१६ मध्ये तरूणांना दहशतवाद पसरवण्याकरीता उत्तेजीत करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये नाईक याला फरारी घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर 'एनआयए'ने मुंबईतील माझगांव येथील ४ मालमत्ता जप्त करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.


दहशतवादी घटना कुठली?

२ वर्षांपूर्वी बांग्लादेशमधील एका कॅफेत दहशतवादी हल्ला झाला होता. अटक करण्यात आलेल्या या हल्ल्यातील आरोपींपैकी एकाने झाकीरच्या प्रवचनांनी प्रेरित होऊन हा हल्ला केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर नाईकच्या 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' या संस्थेला बेकायदेशीर घोषित करण्यात आलं होतं.


दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा

नाईक याच्या विरोधात २०१६ मध्ये दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर जून २०१७ मध्ये त्याला या कायद्यांतर्गत आरोपी ठरवण्यात आलं. नाईक जुलै २०१६ पासून मलेशियात वास्तव्यास आहे. याआधी 'एनआयए'ने झाकीरचे मुंबईतील २ फ्लॅट आणि एक व्यावसायिक संस्था जप्त केली होती.


प्रत्यर्पणाची मागणी

भारत सरकारने जानेवारी २०१८ मध्ये मलेशियाकडे अधिकृतरित्या नाईकच्या प्रत्यार्पणासाठी अपिल केलं आहे. या अपिलावर अजून मलेशियन सरकारने अजून निर्णय घेतला नाही, अशी माहिती मलेशियाच्या मंत्र्यांनी दिली होती.



हेही वाचा-

भारताकडं सोपवण्याचं वृत्त निराधार - झाकीर नाईक

झाकीर नाईकविरोधात रेड कॉर्नर नोटीस नाहीच! भारतीय तपास यंत्रणांना झटका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा