नऊ वर्षानंतर घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

तामिळनाडू राज्यातील तांजाऊर पोलिस ठाण्याअंतर्गत माधवनने अनेक घरफोड्या केल्या होत्या. पोलिस मागावर असल्याचं लक्षात आल्यानंतर तो भूमिगत झाला.

नऊ वर्षानंतर घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक
SHARES

नऊ वर्षापूर्वी तामिळनाडू राज्यात घरफोडी करून फरार झालेल्या सराईत आरोपीला सहार पोलिसांनी अटक केली अाहे. हा आरोपी कुवेतला पळून गेल्यानंतर त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. माधवन आरमुगम असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


लूक आऊट नोटीस

तामिळनाडू राज्यातील तांजाऊर पोलिस ठाण्याअंतर्गत माधवनने अनेक घरफोड्या केल्या होत्या. पोलिस मागावर असल्याचं लक्षात आल्यानंतर तो भूमिगत झाला. त्यानंतर त्याने कुवेतला पलायन केल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी  त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. 


९ वर्षानंतर मुंबईत 

 माधवन हा तब्बल ९ वर्षानंतर मुंबईत परतला. त्यावेळी त्याच्यावर लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असल्याचे इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. सहार पोलिसांनी त्याचा ताबा तामिळनाडू पोलिसांकडे दिला आहे. हेही वाचा - 

दारूसाठी तिघांनी केली मित्राची हत्या

संशयित खलिस्तानी दहशतवाद्याला अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा