एकटेपणामुळे वृद्धेची तर तक्रारीच्या भितीने विद्यार्थ्याची आत्महत्या

पतीच्या निधनानंतर सविता या मानसिक तणावाखाली होत्या. घरात एकटेपणाला त्या कंटाळल्या होत्या. वाढत्या वयामुळे आजारपणाला खिळून राहणाऱ्या सविता यांनी अखेर सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास घराच्या गॅलरीतून उडी टाकून आत्महत्या केली.

एकटेपणामुळे वृद्धेची तर तक्रारीच्या भितीने विद्यार्थ्याची आत्महत्या
SHARES

मुंबईत एका मागोमाग एका आत्महत्येच्या दोन घटना पुढे आल्या असून दोन्ही घटनांमधील आत्महत्येची कारणे ही भविष्यातील चिंता ठरू शकते. शिवडीतील एका वृद्ध महिलेने एकटेपणाला कंटाळून इमारतीवरून उडी टाकत आत्महत्या केली. तर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात एका १४ वर्षीय मुलाने मित्राची आई शाळेतील मुख्याध्यापक आणि घरातल्यांकडे तक्रार करणार असल्याचं कळाल्यानंतर भितीने इमारतीच्या सहाव्या माळ्यावरून उडी टाकून आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांची पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. 


गॅलरीतून उडी मारली

सविता शर्मा या शिवडीच्या क्रिसेंट बाय टाॅवरमध्ये राहत होत्या. २० डिसेंबर २०१८ रोजी सविता यांचे पती लक्ष्मण शर्मा यांचे निधन झाले. त्या दिवसापासून त्या मानसिक तणावात होत्या. त्यांची मुलगी ही डाॅ. एस.एस राव रोड रील अशोका टाॅवरमध्ये रहात होती. पतीच्या निधनानंतर सविता या मानसिक तणावाखाली होत्या. घरात एकटेपणाला त्या कंटाळल्या होत्या. वाढत्या वयामुळे आजारपणाला खिळून राहणाऱ्या सविता यांनी अखेर सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास घराच्या गॅलरीतून उडी टाकून आत्महत्या केली. याबाबतची माहिती सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिल्यानंतर आर.ए.किडवाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली


सहाव्या मजल्यावरून उडी

 शिवाजी पार्क येथे एका विद्यार्थ्याने तो राहत असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या विद्यार्थ्याचे शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत पटत नव्हते. यावरून दुसऱ्या विद्यार्थ्याच्या आईने शाळेचे मुख्याध्यापक आणि त्याच्या आईकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. तक्रारीच्या भितीने त्याने शुक्रवारी सायंकाळी त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे. 



हेही वाचा - 

सोसायटीतील महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणारा अटकेत

अमेरिकन नागरिकांना ३८ लाखांचा गंडा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा