पोलीस शिपाई चालक भरती अर्जाची मुदत ८ जानेवारीपर्यंत

उमेदवारांना mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येणार

पोलीस शिपाई चालक भरती अर्जाची मुदत ८ जानेवारीपर्यंत
SHARES

पोलीस शिपाई चालक आणि राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदाच्या भरतीच्या अर्ज दाखल करण्याची मुदत आता ८ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी २२ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती.  इच्छुक उमेदवार आता ८ जानेवारीपर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज दाखल करू शकतात.

जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक आणि राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) या पदांच्या १८४७ जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांना  mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येणार आहे.  मुंबई, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, अमरावती, रायगड, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, भंडारा, वर्धा, अकोला, बुलढाणा आदी ठिकाणी पोलिस शिपाई चालकाची भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण अशी आहे. तर खुल्या गटातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत) आहे.  


या ठिकाणी भरती

पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागा
पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागा
पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागा
पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – १०३ जागा
पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – १९ जागा
पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – २४ जागा
पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – १८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – २७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – २० जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – ४४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – ७७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – ४१ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – २५ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – ३३ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – ६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – २८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – ३७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – ३४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – ५२ जागा



हेही वाचा -

लाचखोर भाजपा नगरसेविकाला ५ वर्षांचा कारावास

४ बोगस डॉक्टरांना अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा