आॅनलाईन जेवण आॅर्डर करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा तुमची होऊ शकते फसवणूक

अलोक यांनी ते बिल भरले. मात्र पैसे न आल्याचा आणि टेक्निकल प्राॅब्लेम झाल्याचे सांगून त्याने अलोक यांना मोबाइलवर आलेला ओटीपी विचारला.

आॅनलाईन जेवण आॅर्डर करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा तुमची होऊ शकते फसवणूक
SHARES

कोरोनाच्या संक्रमणामुळे हल्ली आॅनलाईन आॅर्डर मागवण्याकडे अनेकांचा कल राहिलेला आहे. मात्र  आॅनलाईन खाद्यपदार्थ मागवणे गिरगावतील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर ठगाने गुगलवर आपला नंबर अॅड करून  या तरुणाची आॅनलाईन फसवणूक केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः- Mumbai rains: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, सर्वत्र ढगाळ वातावरण

गिरगावच्या ठाकूरद्वार परिसरात राहणारे अलोक हे  एका नामकिंत रुग्णालयात रेडिएशन थेअरपिस्ट म्हणून नोकरी करतात. अलोक यांनी १० सप्टेंबर रोजी गुगलवर एका हाॅटेलची माहीती शोधून त्या खाली असलेल्या नंबरवर फोन करून जेवणाची आॅर्डर दिली. यानंतर त्यांनी झोमॅटोवर खाण्याची डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीचा नंबर शोधला. त्यांचे बिल ७२० रुपये इतके झाले. त्यानुसार अलोक यांनी ते बिल भरले. मात्र पैसे न आल्याचा आणि टेक्निकल प्राॅब्लेम झाल्याचे सांगून त्याने अलोक यांना मोबाइलवर आलेला ओटीपी विचारला. नकळत अलोक यांनीही तो ओटीपी फोनवरील व्यक्तीला सांगितला.

हेही वाचाः- सर्वसामान्य रेल्वेतून करू शकतात प्रवास? लवकरच निर्णय होण्याची शक्यता

ओटीपी सांगितल्यानंतर काही वेळातच अलोक यांच्या खात्यातून पैसे टप्या टप्यातून पैसे काढण्यात आल्याचे मेसेज येऊ  लागले. अलोक यांच्या खात्यातून ४० हजार २८८ इतके पैसे काढले. अलोक यांनी तात्काळ बॅकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपले खातं बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर अलोकयांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा