Advertisement

लाॅकडाऊनच्या काळात ३१ लाख रुपयांच्या दारूची आॅनलाईन विक्री

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १०, ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७९३३ अनुज्ञप्ती सुरू आहेत.

लाॅकडाऊनच्या काळात ३१ लाख रुपयांच्या दारूची आॅनलाईन विक्री
SHARES

राज्यात अनलाॅकडाऊनला सुरू झाली असून सरकारने अनेक नियमात शितीलता आणली आहे. राज्याच्या मद्यविक्रीवरील ही निर्बंध सरकारने उठवल्याने ३३ जिल्ह्यात सध्या दारूची आॅनलाईन विक्री केली जात आहे. १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा दिल्याने राज्याच्या तिजोरीत कमालीची भर पडलेली आहे. बुधवारी एका दिवसात  ५२ हजार ११४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली असून अवैध तस्करी करणाऱ्या १०७७५ जणांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे ही नोंदवलेले आहेत.

हेही वाचाः- Covid-19 in Dharavi: धारावीत कोरोनावर यश संघ स्वयंसेवकांमुळेच? हा जरा अतिरेकच- शिवसेना

  राज्यात १५ मे २०२० रोजी पासून ते आतापर्यंत तब्बल ३१ लाख ५५ हजार  ८१३ ग्राहकांनी आॅनलाईन मद्यखरेदी केली आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १०, ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७९३३ अनुज्ञप्ती सुरू आहेत. माञ तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून अवैध मद्य तस्करी केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. ९ जुलै, २०२० रोजी राज्यात १२९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.२२.०४ लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर २४ मार्च,२०२० पासुन ९ जुलै, २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण १०,७७५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५२९७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ९४० वाहने जप्त करण्यात आली असून रु.२८.०४ /- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचाः- CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, 'असा' पाहा ऑनलाईन

राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.१,०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा