Advertisement

CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, 'असा' पाहा ऑनलाईन

विद्यार्थ्यांना डिजिलॉकरच्या माध्यमातून डिजिटल मार्कशीट दिली जाणार आहे. त्यासाठी या वेबसाईटला भेट द्या.

CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, 'असा' पाहा ऑनलाईन
SHARES

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (CBSE) बोर्डाचा १२ वीचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. बारावीचे विद्यार्थी CBSE बोर्डाचे निकाल CBSE चे निकाल पाहण्यासाठी आपण cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in यापैकी कोणत्याही संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

इथं पाहा निकाल

१) http://cbseresults.nic.in

२) http://results.gov.in


कसा पाहाल निकाल?

वर दिलेल्या संकेतस्थळांपैकी क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल.

ऑनलाइन निकालाची आपण पीडीएफ फाइल किंवा प्रिंट काढू शकता. या आधारे आपल्याला पुढची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया करता येऊ शकते.


हेही वाचा : Barti Fellowship: यंदा ४०८ विद्यार्थ्यांना मिळणार डॉ. आंबेडकर फेलोशिप



उमंगचा पर्याय

यासोबतच उमंग मोबाईल अॅपच्या माध्यमातून सुद्धा निकाल पाहू शकता. गतवर्षी निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आले होते. परंतु, कोरोना आणि लॉकडाउनमुळे निकाल जाहीर होण्यासाठी विद्यार्थ्यांना जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.


डिजिटल मार्कशिट

विद्यार्थ्यांना डिजिलॉकरच्या माध्यमातून डिजिटल मार्कशीट दिली जाणार आहे. डिजिलॉकरनं मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी digilocker.gov.in यावर जावे लागेल. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना डिजिलॉकर क्रिडेंशियल्स (लॉग इनची माहिती) एसएमसएसच्या माध्यमातून दिले जातील. याचाच वापर करून डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करता येईल.

रद्द झालेल्या पेपरचे मूल्यांकन

CBSE ने 10वी आणि 12 वीच्या रद्द झालेल्या पेपरचे मूल्यांकन करण्यासाठी असेसमेंट स्कीम आधीच लागू करण्यात आली आहे. बोर्डानं यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर माहिती जारी केली होती. बोर्डाच्या नवीन असेसमेंट स्कीमनुसार, जारी करण्यात आलेले नियम CBSE च्या अधिकृत वेबसाइट https://www.cisce.org वर पाहता येतील.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर CBSEनं १ ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तसंच असेसमेंट स्कीम अंतर्गत निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. बोर्डाच्या परीक्षांवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की, १०वी आणि १२वीचे निकाल १५ जुलै रोजी जारी करावे. यानंतरच बोर्डानं आजा १२वीचा निकाल जाहीर केला आहे.



हेही वाचा

राज्यातील ५४,८२४ शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज

University Exams 2020: यूजीसीच्या सूचनेनुसार परीक्षा घ्याव्याच लागतील!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा