शीना बोरा हत्या प्रकरणात सहकाऱ्यांनीच विश्वास घात केला - राकेश मारिया

पीटरला मी नाही तर सेवेतील एका बड्या अधिकाऱ्याने पाठीशी घातले. तपासा दरम्यान त्याची कल्पनाच नसल्याचे मारिया यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

शीना बोरा हत्या प्रकरणात सहकाऱ्यांनीच विश्वास घात केला - राकेश मारिया
SHARES

मुंबईतल्या बहुचर्चित अशा शीना बोरा हत्याकांडात सहकाऱ्यांनीच विश्वासघात करत, चुकीची माहिती पसरवून अंधारात ठेवल्याचा गौप्यस्फोट माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी केला आहे. पीटरला मी नाही तर सेवेतील एका बड्या अधिकाऱ्याने पाठीशी घातले. तपासा दरम्यान त्याची कल्पनाच नसल्याचे मारिया यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये गरजेपेक्षा अधिक लक्ष घातल्याने तसेच पीटर मुखर्जी याला वाचावीत असल्याचा ठपका ठेवत मारिया यांची तडकफडकी बदली करण्यात आली होती.

 

मुंबईत १९९३ साली बाॅम्ब स्फोटात मुख्य जबाबदारी पार पाडणाऱ्या राकेश मारिया यांचे लवकरच ‘लेट मी से इट नाऊ’ हे पुस्तक येत आहे. या पुस्तकात मारिया यांनी  त्यांच्या आतापर्यंतच्या  प्रवासाबाबात लिखान केले आहे. त्यात अनेक बहुचर्चित गुन्ह्यांबाबत ही त्यांनी माहिती लिहिली आहे. त्याच्या कार्यकाळात वादग्रस्त ठरलेला आणि त्या गुन्ह्यांमुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेला शीनाबोरा हत्याकांड याचा ही समावेश आहे. एका मासिकाशी बोलताना त्यांनी अद्याप बाहेर न आलेली माहिती मांडली आहे.

 

मारिया यांनी शीना बोरा प्रकरणी माजी पोलिस आयुक्त जावेद अहमद आणि आणि तेव्हाचे सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'पीटर मुखर्जी याला याबाबत त्यावेळी विचारले असता, त्याने देवेन भारती यांना माहिती होती असे सांगितले. मात्र भारती यांना विचारले असता त्यांनी याबाबत नेहमीच मौन बाळगले', असे मारिया लिहितात. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणात काही स्तरावर संवाद साधण्यात त्रुटी राहिली असावी, अशी जोड देखील मारिया यांनी दिली आहे. काहींनी मुख्यमंत्र्यांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली असावी, अशीही शक्यता वर्तवली आहे. जावेद अहमद यांनी ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात पीटर मुखर्जीला आमंत्रित केले होते. त्याबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केले, असा प्रश्नही मारिया यांनी उपस्थित केला आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा