३ मिनिटांत कार चोरणाऱ्या अट्टल चोराला अटक

अंधेरी, ओशिवरा या उच्चभ्रू वस्तीतील महागड्या गाड्यांची चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. सत्येद्रसिंग शेख असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक गाड्या चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

३ मिनिटांत कार चोरणाऱ्या अट्टल चोराला अटक
SHARES

अंधेरी, ओशिवरा या उच्चभ्रू वस्तीतील महागड्या गाड्यांची चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. सत्येद्रसिंग शेख असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक गाड्या चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

३ मिनिटांत गाडी चोरी

मूळचा राजस्थानचा रहिवासी असलेला सत्येंद्रसिंग अल्पवयीन वाहन चोरांच्या संगतीत होता. त्यांच्यासोबत राहून अवघ्या ३ मिनिटात गाडी कशी चोरायची याची त्याने माहिती करून घेतली होती. त्यानंतर सत्येंद्रसिंग हा त्या टोळीचा सदस्य झाला. त्याने वर्षभरात याच परिसरातून १० हून अधिक गाड्या चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याच्या विरोधात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, पुणे इथं वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आंतराराज्य टोळी

ओशिवरा परिसरात मार्च महिन्यात एक फाॅर्चुनर गाडी चोरीला गेली होती. त्या प्रकरणातील आरोपी विमानतळावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विमानतळाहून सत्येंद्रसिंगला अटक केली. त्याच्या चौकशीतून त्याने ती गाडी अवघ्या ५ लाखांना अंधेरीतल्या मोहम्मद सलीम मोहम्मद अहमद कल्लन याला विकली. त्याने ती गाडी पुढे राजस्थानमध्ये नेऊन विकल्याचं सांगितलं. न्यायालयाने सत्येंद्रसिंगला १६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.हेही वाचा-

कुख्यात गुंड अरूण गवळी मुंबईत, २८ दिवसांच्या सुट्टीवर

करण ओबेराॅयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा