पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. बँकेचे बुडालेले पैसे मिळवून देण्यासाठी हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची (एचडीआयएल) मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करण्यास वाधवान यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करावा अशी मागणी वाधवान यांच्या वकिलांनी केली. ही मागणी फेटाळून लावत गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित याचिकेवरील आपला निकाल राखून ठेवला आहे. पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे.
पीएमसी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या पितापुत्राला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने एचडीआयएल कंपनीच्या मालकीची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकर परत मिळावे यासाठी कंपनीच्या मालकीची मालमत्ता लवकरात लवकर विकण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अॅड. सरोश दमानिया यांनी केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
वाधवान यांच्यावतीने हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये या लिलावाबाबत संमती देण्यात आलेली आहे. तसंच गरज पडल्यास इतर मालमत्तांच्या लिलावाबाबतही विचार करू, अशी हमी आरोपींच्या वतीने देण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
हेही वाचा -
PMC घोटाळा : एचडीआयएलची मालमत्ता विकण्यास हरकत नाही - सारंग वाधवान