‘माझ्या जीवाला धोका’, अजामीनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी उच्च न्यायालयात

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांना फसवून भारताबाहेर पळ काढणारे नीरव मोदी आणि मेहुल चाेक्सी या दोघांविरोधात इंटरपोलने रेड काॅर्नर नोटीस काढली आहे. सोबतच सीबीआय न्यायालय आणि विशेष पीएमएलए न्यायालयाने मेहुल चोक्सी व अन्य ५ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे.

‘माझ्या जीवाला धोका’, अजामीनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी उच्च न्यायालयात
SHARES

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याने 'आपल्या जीवाला धोका आहे', असं म्हणत मनी लाॅड्रिंग प्रतिबंधक (पीएमएलए) न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वाॅरंटविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांना फसवून भारताबाहेर पळ काढणारे नीरव मोदी आणि मेहुल चाेक्सी या दोघांविरोधात इंटरपोलने रेड काॅर्नर नोटीस काढली आहे. सोबतच सीबीआय न्यायालय आणि विशेष पीएमएलए न्यायालयाने मेहुल चोक्सी व अन्य ५ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे.

कुणाच्या नावांचा समावेश?

अंमलबजावणी संचालनालया (इडी) ने २ जुलै रोजी चोक्सीसह अन्य ५ जणांविरोधात 'पीएमएलए' कायद्याखाली नोंदवलेल्या गुन्ह्यांअंतर्गत अजामीनपात्र वॉरंट काढण्याची विनंती केली होती. त्यात पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेचा व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, गीतांजली ग्रुपच्या बँकिंग ऑपरेशन्सचा उपाध्यक्ष विपुल चितलिया, जैन डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेडचा मालक धर्मेश बोथ्रा, गीतांजली जेम्स लिमिटेडचा संचालक सुनील वर्मा, ब्रिलियंट डायमंड लिमिटेड कंपनीतील जयेश शाह यांच्या नावांचाही समावेश आहे. त्यानुसार 'पीएमएलए' न्यायालयाने या सर्वांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढलं होतं.

आरोपाचं खंडन

सद्यस्थितीत चोक्सी वेस्ट इंडिज बेटांपैकी एक असलेल्या अँटिग्वा इथं रहात आहे. तिथून त्याने एका व्हिडिओद्वारे आपल्यावर ईडी आणि सीबीआयने केलेले सगळे आरोप चुकीचे असल्याचा दावा केला. मला घोटाळ्यात अडकवलं जात असून माझी मालमत्ता चुकीच्या पद्धतीने जप्त करण्यात आल्याचा आरोपही त्याने केला होता.

हेही वाचा-

मेहूल चोक्सीची अटक वॉरंट रद्दची मागणी

नीरव मोदीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा