सचिन सावंत हत्येप्रकरणी ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात

कुरार गावच्या विकासासाठी एसआर प्रोजेक्ट सुरू आहे. याच प्रोजेक्टवरील मतभेदातून हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सावंत यांच्यावर यापूर्वी २००९ मध्ये अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता. मात्र त्यात ते बचावले होते. त्यानतर शार्प शूटरच्या मदतीने सचिन यांचा काटा काढण्यात आल्याचं आता उघडकीस आलं आहे.

सचिन सावंत हत्येप्रकरणी ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात
SHARES

मालाडच्या कुरार व्हिलेजमधील शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची हत्या करणाऱ्या ४ जणांना कुरार पोलिसांनी यूपीतून ताब्यात घेतलं आहे. या ४ आरोपींपैकी दोन शार्पशूटर असल्याचं तपासात पुढं आलं आहे. एसआरए प्रोजेक्टच्या वादातूनच दुचाकीहून आलेल्या दोघांनी सचिन यांच्यावर ४ गोळ्या झाडून पळ काढला होता.


का केली हत्या?

मालाडमधील अप्पापाडा येथील सचिन सावंत हे शिवसेनेच्या शाखा क्रमांक ३९ चे माजी उपशाखाप्रमुख होते. २३ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते मित्रांसोबत दुचाकीहून जात होते. सावंत यांची दुचाकी कांदिवलीच्या आकुर्ली रोडवरून गोकुळनगरात पोहोचले असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी सावंत यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढला. या गोळीबारात दोन गोळ्या सावंत यांना लागल्यानंतर स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी सावंत यांना मृत घोषित केलं.


यापूर्वीही झाला होता हल्ला

कुरार गावच्या विकासासाठी एसआर प्रोजेक्ट सुरू आहे. याच प्रोजेक्टवरील मतभेदातून हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सावंत यांच्यावर यापूर्वी २००९ मध्ये अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता. मात्र त्यात ते बचावले होते. त्यानतर शार्प शूटरच्या मदतीने सचिन यांचा काटा काढण्यात आल्याचं आता उघडकीस आलं आहे.


'असे' आले आरोपी ताब्यात

तब्बल १५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर कुरार पोलिसांनी यूपीतून दोन शूटरसह अन्य दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांनाही पोलिस मुंबईत घेऊन येत आहे. या चौघांसह कुरार परिसरातील दोघांवर संशय व्यक्त करत पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या आरोपींची नावे अद्याप पोलिसांनी जाहीर केली नसून मंगळवारी या गुन्ह्यानिमित्त पोलिस पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


तिसरी घटना

उत्तर मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात येण्याची ही तिसरी घटना आहे. या पूर्वी कांदिवलीच्या समतानगर परिसरात राहणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि बोरिवलीचे उपविभागप्रमुख अशोक सावंत यांची देखील अशा प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर २०१५ मध्ये शिवसेनेच्या चित्रपटसृष्टीतील सचिव राजू शिंदे यांची कंत्राट मिळण्याच्या वादातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.हेही वाचा-

मालाडमध्ये सेना उपशाखाप्रमुखाची गोळ्या घालून हत्या

'प्री प्लॅन' करून किर्ती व्यासची हत्याRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा