न्यायालयातून पळून गेलेला आरोपी ११ वर्षांनी जाळ्यात

११ वर्षांपूर्वी युसूफ सय्यदला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अटक केली होती.

न्यायालयातून पळून गेलेला आरोपी ११ वर्षांनी जाळ्यात
SHARES

न्यायालयात नेताना पळून गेलेला आरोपी तब्बल ११ वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. युसूफ सय्यद (वय ३५) असं या आरोपीचं नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी मुंब्रा येथून त्याला अटक केली. युसूफवर मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. 

११ वर्षांपूर्वी युसूफ सय्यदला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अटक केली होती.१३ जून २००८ रोजी त्याला माझगाव येथील न्यायालयात पोलीस घेऊन गेले होते. त्या वेळी पोलिसांना चकवा देत त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. त्यानंतर तो पोलिसांच्या हाती कधीच लागला नाही. त्याच्याविरुद्ध अंधेरी, डी. एन. नगर, काळाचौकी, भायखळा पोलीस ठाण्यात हत्या, लूट, घरफोडी आणि हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल होते. यापैकी अंधेरीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्याला दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मागील अनेक वर्ष युसूफ स्वत:चे नाव आणि पत्ता बदलून विविध ठिकाणी राहत होता. सध्या तो मुंब्रा परिसरात राहत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला मंगळवारी राहत्या घरातून अटक केली. 


हेही वाचा -

पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या, दीड वर्षानंतर गुन्हा उघडकीस

मुंबई महापालिका करणार २२८ मालमत्ता जप्त




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा