अारोपींना सोडवण्यासाठी बोगस जामीनदार बनलेली टोळी गजाआड


अारोपींना सोडवण्यासाठी बोगस जामीनदार बनलेली टोळी गजाआड
SHARES

आरोपींच्या जामिनासाठी न्यायालयात बोगस जामीनदार उभा करून न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली अाहे.  या टोळीने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या खोट्या सह्या व रबरी शिक्के वापरल्याचे तपासात पुढे आले आहे. यामध्ये अन्य काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.


कोट्यावधींचा गैरव्यवहार 

मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २०१३ मध्ये डी.टी. एस कंपनीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संजय ओमप्रकाश शर्मा याला अटक केली होती. कंपनीला बोगस बिले आणि कामगारांची बनावट पे स्लिप दाखवून संजयने कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला होता. अटकेनंतर त्याने न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संजयला जामीन मिळावा यासाठी उस्मान गणी उमर शेख, इम्रान मुबारक अली शेख, रशीद बब्बे हुसेन शेख खान, मोहम्मद मन्सुर आलम, मोहम्मद शमशाद नूर रझा यांना जामीनदार म्हणून उभे केले.  


बनावट कागदपत्रे

या पाचही जामीनदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी स्वत:ची मूळ माहिती लपवून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, कंपनीचे ओळखपत्र आणि संबधित कागदपत्रांवर स्थानिक पोलिस ठाणे व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची खोटी सही केली असल्याचे उघडकीस अाले. न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. 


फरार आरोपी

या प्रकरणी पोलिसांनी उस्मान गणी उमर शेख आणि मोहम्मद शमशाद नूर रझा याला अटक केली होती. तर दोनच दिवसापूर्वी इम्रान मुबारक अली शेख याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली, इम्रानच्या चौकशीतून पोलिसांनी फरार आरोपी रशीद बब्बे हुसेन खान (५५), मोहम्मद मन्सूर आलम अब्दुल वाहिद अन्सारी (४३ याला अटक केली. ही टोळी स्वत:ची माहिती लपवून आरोपींना बोगस जामीनदार राहून सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.हेही वाचा - 

एक लाखांच्या बनावट नोटांसह एकाला अटक

व्हाॅट्स अॅपवर विवाहितेला अश्लील मेसेज
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा