COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

दोन हजारांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट, काळाचौकीतील लॅबचालकाला अटक

ज्या नागरिकांचे अहवाल तयार करण्यात आले होते, त्यांच्या स्वॅबबाबत विचारले असता, कोणत्याही प्रकारचे स्वॅब घेण्यात आले नसल्याचं आढळलं.

दोन हजारांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट, काळाचौकीतील लॅबचालकाला अटक
SHARES

कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणाऱ्या लॅबचालकाला पोलिसांनी अटक केली. हा लॅबचालक कोणतेही स्वॅब न घेता दोन हजार रुपयांमध्ये कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देत होता.

काळाचौकीतील स्वामी पॅथॉलॉजी लॅबॉरटरीजमध्ये पैसे देऊन कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दिला जात असल्याची माहिती गुन्हे नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या लॅबवर छापा टाकला. यावेळी लॅबमध्ये कम्प्युटरवर कोरोनाचे अहवाल तयार केले जात असल्याचं आढळलं.  ज्या नागरिकांचे अहवाल तयार करण्यात आले होते, त्यांच्या स्वॅबबाबत विचारले असता, कोणत्याही प्रकारचे स्वॅब घेण्यात आले नसल्याचं आढळलं. या प्रकरणी पोलिसांना लॅबचा चालक विद्याधर आंबोणकर याला अटक केली आहे.

लॅबमधून पोलिसांनी मोबाइल, कम्प्युटर, प्रिंटर्स, बनावट कोरोना अहवाल आणि इतर साहित्य हस्तगत केलं आहे. येथून दिवसाला ८ ते १० अहवाल दिले जात असल्याचं समोर आलं आहे. एका महिन्यापासून अधिक काळ हा प्रकार चालू होता. आतापर्यंत आंबोणकर याने तीनशे ते चारशे बनावट कोरोना अहवाल दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

स्वामी पॅथॉलॉजी लॅबमधून कोरोनाचे निगेटिव्ह अहवाल घेणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.  खासगी कार्यालयात काम करण्यासाठी अथवा प्रवासासाठी असा अहवाल घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे म्हटलं जात आहे. हेही वाचा -

  1. मुलांसाठी वरळीत होणार ५०० खाटांचे जम्बो कोरोना केंद्र

आठवड्याभरात 'इतक्या' पोलीसांना कोरोनाची लागण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा