बुरखाधारी चोरांचा पर्दाफाश, सकाळी चालवायचे टॅक्सी रात्री करायचे चोऱ्या

दोघेही इतके हुशार होते की, पोलिसांपासून ओळख लपवण्यासाठी बुरखा घालून चोऱ्या करायचे.

बुरखाधारी चोरांचा पर्दाफाश, सकाळी चालवायचे टॅक्सी रात्री करायचे चोऱ्या
SHARES

सकाळी टॅक्सी चालवून घरखर्च भागत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन टॅक्सी चालकाला शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. नझीर शेख (32), दिलीप यादव (23) अशी या दोघांची नावे आहेत. तर या दोघांनी चोरीचा माल कुर्लातील व्यापारी अब्दुल रौफ (28) याला विकल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याला ही या गुन्ह्यांत अटक केली आहे. दोघेही इतके हुशार होते की, पोलिसांपासून ओळख लपवण्यासाठी बुरखा घालून चोऱ्या करायचे.  मागील अनेक दिवसांपासून पोलिस या दोघांच्या मागावर होते.


 हेही वाचाः- अभिनेत्रीचे खासगी फोटो शेअर केल्याने कास्टिंग डिरेक्टरला अटक


मूळचे उत्तरप्रदेशचे राहणारे दोन्ही आरोपी वडाळा आणि शिवडी परिसरात राहतात.  उरनिर्वाहासाठी दोघेही टॅक्सी चालवतात. यातील आरोपी दिलीप हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात वडाळा आणि शाहू नगर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने ते क्षेत्र सोडून टॅक्सी चालवण्यास सुरूवात केली. टॅक्सीच्या व्यवसायातूनच त्याची ओळख नझीरशी झाली. व्यवसायात यश नसल्यामुळे दोघांचाही घरखर्च भागत नव्हता. अशातच पेपरमध्ये घडरफोड्यांविषयी बातमी दिलीपने वाचली. या बातमीत पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी कशा प्रकारे बुरख्याचा वापर करून पोलिसांना गुंगारा दिल्याचे वृत्त होते.  पेपरमधील याच बातमीच्या आधारे पून्हा चोऱी करण्याचे त्याने ठरवले. तसेच आपल्या कटात नझीरला ही सामील करून घेतले.  त्यानुसार दोघे मागील अनेक दिवसांपासून शिवडीतल्या दारूखाना येथे असलेल्या V-TAL कंपनीच्या गेटवर भाड्यासाठी उभे रहायचे. त्यांनी त्या गोडाऊनची पूर्ण रेखी केली होती. या गोडाऊनमध्ये मोठ मोठ्या कंटेनरचे साखळी लाँक बनवण्याचे काम केले जायचेय. काही टन जड असलेल्या या लाँकला बाजारात खूप किंमत होती.

 

हेही वाचाः- तुम्हच्या घरात भेसळयुक्त दूध तर येत नाहीना, भेसळयुक्त दूधाची विक्री करणाऱ्यांचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला


त्यानुसार दोघांनी मार्च मध्ये बुरख्याच्या मदतीने गोडाऊनचे ताळे तोडून 3 लाख 56 हजाराची चोरी केली. या प्रकरणी शिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण मांढरे यांच्या पथकाने तपासाला सुरूवात केली.  गोडाऊन मधील सीसीटिव्हीत बुरखे घातलेले आरोपी पोलिसांना स्पष्ठ दिसत होते. मात्र त्यांची ओळख पटत नव्हती. आपला गुन्हा पचणी पडल्याचे वाटत असतानाच दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने किरण मांढरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.  पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच आरोपींनी गुन्ह्यांची कबूली दिली.

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा