लोकलमधील सराईत आरोपी अटकेत


लोकलमधील सराईत आरोपी अटकेत
SHARES

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ अद्यापही सुरूच अाहे. शेवटची लोकल गेल्यानंतर स्थानकावर थांबलेल्या प्रवाशांचं साहित्य चोरताना अलीकडेच वांद्रे पोलिसांनी दोन सराईत भावांना अटक केली आहे. सलमान शेख आणि सद्दाम शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांवर रेल्वेतील विविध पोलिस ठाण्यात अनेक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

IMG-20180805-WA0000.jpg


लॅपटाॅपची बॅग गायब

वसई परिसरात राहणारा सूरज डिमेलो हा एका नामांकित कंपनीत कामाला आहे. ६ जुलै रोजी सूरज कामावरून सुटल्यानंतर त्याच्या मित्रांसोबत खार (पश्चिम) येथील रेस्टाॅरंटमध्ये पार्टीसाठी गेला होता. दारूचे दोन-चार पेग प्यायल्यानंतर तो रात्री १.३० वाजता वांद्रे स्थानकावर अाला. पण तोपर्यंत शेवटची विरार लोकल निघून गेली होती. अखेर त्यानं रेल्वे स्थानकावरच थांबण्याचं ठरवलं. स्थानकावर बसल्या-बसल्या काही वेळानं त्याचा डोळा लागला. पहाटे जाग आल्यानंतर मुकेशला सोबत असलेली लॅपटाॅपची बॅग दिसली नाही. बॅगेत कंपनीची महत्त्वाची कागदपत्रं, कंपनीचा लॅपटाॅप, दोन मोबाइलसह पर्स होती. त्यामुळे घाईघाईत मुकेशनं पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगितला.


सीसीटीव्हीद्वारे लावला छडा

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, दोन व्यक्तींनी बॅग चोरल्याचे दिसून अाले. त्यापैकी सलमान अाणि सद्दाम हे सराईत चोर असल्याचे त्यांच्या रेकाॅर्डवरून पोलिसांना लक्षात अाले. सद्दाम हा कुटुंबियांसोबत महालक्ष्मीच्या धोबीगाठ येथे राहतो तर सलमान गोरेगांवमध्ये राहतो. सद्दामला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. चोरीचे साहित्य विकण्यासाठी आलेल्या सलमानलाही चोरीच्या साहित्यासह अटक केल्याची माहिती वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल उडनशिव यांनी दिली.


हेही वाचा -

मधुचंद्राच्या रात्री घात झाला, अंथरूणात 'ती' ऐवजी 'तो' निघाला!

ठाण्यात तरूणीची दिवसाढवळ्या हत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा