SHARE

कांजूरमार्ग येथील सिनेव्हिस्टा स्टुडिओ आगीप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतलं आहे. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला, तर १५० कलाकार आणि तंत्रज्ञ थोडक्यात बचावले होते.

कांजूरमार्गच्या एलबीएस मार्गावरील गांधीनगर जंक्शन इथं सिनेव्हिस्टा स्टुडिओ आहे. या स्टुडिओला ६ जानेवारी रोजी आग लागली. फ्लोअर क्रमांक १२ मध्ये आग लागली त्यावेळेस स्टुडिओमध्ये ‘बेपनाह’ या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. एवढंच नव्हे, तर त्यावेळेस सुमारे साडेतीन हजार चौरस फुटांच्या या स्टुडिओमध्ये १५० कलाकार आणि तंत्रज्ञ काम करत होते. यांत कलाकार जेनिफर विंगेट आणि हर्षद चोप्रा यांचाही समावेश होता.

आगीच्या वेळेस सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. परंतु सकाळी जळालेल्या वस्तू बाहेर काढत असताना तिथं टेलिव्हिजन प्राॅडक्शनचा २० वर्षीय कर्मचारी गोपी वर्माचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पार्कसाईट पोलिस ठाण्यात ३०४( अ) कायद्यानुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सोपवलेल्या चौकशी अहवालानंतर पोलिसांनी स्टुडिओचे दोन भागीदार आणि एक व्यवस्थापक अशा तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.हेही वाचा-

मोजोस बिस्ट्रो, वन अबोव्हला परवानगी दिलीच कशी? उच्च न्यायालयानं टोचले महापालिकेचे कान

कांजूरमार्गचा सिनेव्हिस्टा स्टुडिओ जळून खाक, एकाचा मृत्यू

‘नवरंग’ स्टुडिओच्या मालकावर गुन्हा दाखल, जुन्या चित्रफितींमुळे आग फोफावली


संबंधित विषय
ताज्या बातम्या