चेंबूरमध्ये पोलीस शिपायाला मारहाण


SHARE

अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरू असताना दोघा रहिवाशांनी एका पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी चेंबूरच्या पांजरापोळ परिसरात घडली. अमित झरेकर असे या पोलीस शिपायाचे नाव असून ते ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 

चेंबूरच्या पांजरापोळ सर्कल येथे बुधवारी पालिकेकडून तोडक कारवाई सुरू होती. याच दरम्यान काही रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांना घेराव घालत कामामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बंदोबस्तासाठी असलेले झरेकर त्याठिकाणी गेले. त्यांनी रहिवाशांना समजावण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र यातील एका अनोळखी महिलेने झरेकर यांच्या कानशीलात लगावली. दुसऱ्या एका इसमाने त्यांना धक्काबुक्की केली. 


हेही वाचा

पुन्हा झाली पोलीस शिपायाला मारहाण

सुरक्षा रक्षकास मारहाण करून माजी नगरसेवक पसार


घटनेनंतर झरेकर यांनी तात्काळ ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात त्या दोघांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या