१ कोटी ६० लाखांच्या चरससह तीन जणांना अटक


१ कोटी ६० लाखांच्या चरससह तीन जणांना अटक
SHARES

मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ पथक एका मागोमाग एक मोठी कारवाई करत आहे. गेल्या फक्त आठ दिवसातच मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट बाराने मंगळवारीही दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईदरम्यान१ कोटी ६० लाख रुपयांच्या तीन किलो चरससह तीन जणांना अटक केली आहे.

हेही वाचाः- मुंबईतील ७८ टक्के भाडेकरूंना स्वत:च्या घरात जाण्याचे वेध

अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना दहिसर पूर्व येथे पोलिसांनी गस्त सुरू केली होती. या दरम्यान पोलिसांना तीन जण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करणाऱ्या तिघांना पळून जाण्यास अटकाव केला. आरोपींकडून जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत एक कोटी साठ लाख रुपये एवढी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसंच पोलिसांनी आणखी दोन किलो चरस जप्त केलेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची रवानगी न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

हेही वाचाः- लवकरच मुंबईत धावणार विनाचालक मेट्रो

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक अनेक सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावत आहे. तर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाला टक्कर देत कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही पथकांच्या कारवाया जोरात सुरू आहेत. मात्र मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येतात कुठून आणि कसे हा मोठा संशोधनाचा भाग आहे. बॉलिवूड आणि हायप्रोफाईल सोसायटी या अंमली पदार्थांच्या आहारी गेल्या असल्याचं केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मुंबई पोलिसांच्या विरोधी पथकाने केलेल्या कारवायांवरुन स्पष्ट होत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा