सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ ६ जणांची पोलिसांनी केली चौकशी

सोशल मिडियावर त्याने उचललेल्या टोकाच्या पाऊलाविषयी नवनवीन तर्क वितर्क लावले जात असताना. सोमवारीच्या वांद्रे मुंबई पोलिसांनी ६ जणांची चौकशी केली.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ ६ जणांची पोलिसांनी केली चौकशी
SHARES

प्रसिद्द अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांना त्याच्या खोलीत कोणतिही सुसाइड नोट मिळून आलेली नाही. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप ही गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणी वांद्रे पोलिसात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी ६ जणांची चौकशी केलेली आहे. त्यात एक अभिनेत्याचा ही समावेश असल्याचे खात्री लायक सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचाः- सुशांत तू का झालास शांत?

मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावखाली असलेल्या सुशांत सिंग राजपूतने रविवारी सकाळी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने उचललेल्या या टोकाच्या पाऊलाने अनेकांना धक्का बसला. नुसत्या बाँलीवूडमधील नाही तर राजकीय नेते, खेळाडू सर्वांनीच सुशांतला सोशल मिडियावरून श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप ही पुढे आलेले आहे.  अनेकांना या मागे काही कट असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र पालिकेच्या शवविच्छेन अहवालात सुशांतचा मृत्यू गळफास लावूनच झाला असल्याचे पुढे आल्यानंतर या वावड्यांना अखेर पूर्णविराम मिळाला. सुशांतवर सोमवारी विलेपार्ले येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.  सोशल मिडियावर त्याने उचललेल्या टोकाच्या पाऊलाविषयी नवनवीन तर्क वितर्क लावले जात असताना. सोमवारीच्या वांद्रे मुंबई पोलिसांनी ६ जणांची चौकशी केली. मात्र या ६ जणांच्या चौकशीत ही पोलिसांना ठोस काही सापडलेले नाही.

हेही वाचाः- सुशांतची आत्महत्या होती की हत्या? : कंगना राणावत

ज्या दिवशी सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसाच्या दिनक्रमानुसार या ६ जणांची चौकशी केल्याचे सांगितले जात आहे. रविवारी सकाळी सुशांत सकाळी ६.३० वा. उठला. ९ वा. त्याने ज्यूस पिवून ९.३० च्या सुमारास बहिणीला फोन लावला. १०.३० वा. सुशांत पून्हा त्याच्या खोलीत गेला. तो बाहेर आलाच नाही. ११ च्या सुमारास त्याच्या नोकराने त्याला  पून्हा जेवणासाठी विचारले. मात्र त्याच्या खोलीतून कोणतेही प्रतिउत्तर आले नाही. १२ वाजले तरी सुशांत घराबाहेर न आल्याने पून्हा नोकर त्याला उठवायला गेला. मात्र तरी सुशांत खोलीतून कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे नोकराने सुशांतसोबत राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थ याला सांगितले. सिद्धार्थ हा आर्टीस्ट आहे. त्याने सुशांतला फोनकेले मात्र सुशांत फोन ही घेत नव्हता. मग सिद्धार्थने त्याच्या गोरेगाव येथे राहणाऱ्या बहिणीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याने चावीवाल्याला बोलावले. चावीवाल्याने ड्युप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यानंतर सुशांतने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची बहिण, २ मॅनेजर, १ कूक, चावीवाल आणि त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी याची आतापर्यंत चौकशी केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. तर या आत्महत्येमागे नेमके कोणते कारण आहे. ते शोधून काढण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा