पोलिसांना आता अंमलदार म्हणा...

पोलीस शिपाईपासुन ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकासाठी पोलिस अमंलदार असा शब्द प्रयोग करावा.

पोलिसांना आता अंमलदार म्हणा...
SHARES
महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) काम करणारे पोलीस शिपाई पासून पोलीस हवालदार तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा सरसकट उल्लेख पोलीस कर्मचारी असा करण्यात येत होता. पोलीस कर्मचाऱ्यांना शिपाई या संबोधनावर आक्षेप होता. यामुळे यापुढे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, नायक पोलीस शिपाई, जमादार, सहायक फौजदार यांचा ‘पोलीस अंमलदार’(Police Amaldar) असा उल्लेख करण्यात यावा, असे परिपत्रक राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांसाठी काढण्यात आले आहे. तसेच पोलीस घटक कार्यालयाकडून शासनाला, महासंचालक कार्यालयात व इतर घटक कार्यलयांना होणाऱ्या पत्र व्यवहारात हा बदल तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचाः- शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही- उद्धव ठाकरे

पोलीस महासंचालक कार्यालयातून दस-याच्या मुहुर्तावर अशा प्रकारचे पोलीस पत्रक काढल्यांने, राज्यातील पोलीस दलात आनंदाचे वातवारण आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-याापेक्षा कनिष्ठ अधिकारीवर्ग हा स्वतः फिल्डवर उतरीत सर्वोत्कृष्ट कामगिरी पार पाडत असतात. मात्र त्यातही त्यांना पोलीस कर्मचारी असे संबोधले जाते. पोलिस दल ही फोर्स आहे, त्यामुळे कर्मचारी अथवा अंमलदार शब्दप्रयोगच योग्य असल्याच्या भावना काही पोलिसांनी व्यक्त केल्या. राज्य पोलिस दलात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दर्जाच्या अधिका-याला देखिल पोलीस कर्मचारी असे संबोधले जात असल्याने, पोलीस दलातील कनिष्ठ वर्गात सातत्याने नाराजी होती. तसेच ही नाराजी वेळोवेळी या कनिष्ठ वर्गाने वरिष्ठांच्य्ाा निदर्शनास आणुन दिली होती. मात्र आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक राजेश प्रधान यांनी स्वतः लक्ष घालत ही बाब पोलीस महासंचालकांच्या निदर्शनास आणुन दिली. त्यानुसार, पोलीस महासंचालकानी राज्यातील पोलीस शिपायापासुन ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाना पोलीस अमलदार संबोधण्यात यावे, अशा प्रकारचे परिपत्रक काढले.

हेही वाचाः- सुशांत सिंग राजपूत प्रकरणः पुण्यातून चरससह टॅक्सी चालकाला अटक

 हे परिपत्रक राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये तसेच जिल्हा अधिक्षक आणि पोलीस दलातील विविध विभागाना पाठविण्यात आले आहेत. यामध्ये सर्व वरिष्ठ अधिका-याना पत्रव्यवहार करताना अथवा कनिष्ठ वर्गाला संबोधताना पोलीस कर्मचारी हा शब्द न वापरता पोलीस अमलदार हा शब्द वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा