सुशांत राजपूत उपचार घेत असलेल्या डाॅक्टरांचा जबाब पोलिसांनी नोंदवला

आतापर्यंत या प्रकरणात ३० हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. केरसीच्या चौकशीतून सुशांतच्या आत्महत्या करण्यामागेची कारणे उजेडात येऊ शकतात.

सुशांत राजपूत उपचार घेत असलेल्या डाॅक्टरांचा जबाब पोलिसांनी नोंदवला
SHARES
नैराक्षेतून सुशांतने आत्महत्या केल्याचे बोलले जात असताना. नैराक्षे असताना तो ज्या मानसशास्त्रज्ञ डाँक्टरांकडे उपचार घेत होता. त्या डाँक्टर केरसी चावडा यांचा वांद्रे पोलिसांनी काल रात्री जबाब नोंदवला. आजही केरसी यांना चौकशीसाठी बोलवले असल्याचे समजते. आतापर्यंत या प्रकरणात ३० हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. केरसीच्या चौकशीतून सुशांतच्या आत्महत्या करण्यामागेची कारणे उजेडात येऊ शकतात. 
 हेही वाचाः- म्हणून सोनू सूदचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आभार
सुशांतसिंह राजपूतने  आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. मात्र सर्व काही  सुरळीत सुरू असताना, त्याने इतके टोकाचे पाऊल का फचलले हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्या प्रकऱणीच पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांची चौकशी केली आहे. सुशांतच्या आत्महत्येमागे बाँलीवूडमधील घराणेशाही कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. सुशांतने केलेले चित्रपटांचे काँन्ट्रेक्ट लेटर पोलिसांनी तपासासाठी मागवून घेतले होते. तर प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साळी, शेखर कपूर यांचे ही जबाब पोलिसांनी नोंदवलेले आहे. आत्महत्येपूर्वी सुशांत हा नैराक्षेत होता. मानसिक तणावाखाली असल्याने तो मानसशास्त्रज्ञ डाँक्टर केरसी चावडा यांच्याजवळ उपचार घेण्यासाठी जात होता. त्यामुळे पोलिसांनी चावडा यांना गुरूवारी जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. रात्री उशिरपर्यंत त्यांच्या जबाब नोंदवण्याची प्रक्रिया ही सुरू होती. 
 हेही वाचाः- कालच्या मुसळधार पावसात ‘इतक्या’ दुर्घटना मुंबईत घडल्या
या पूर्वी सुशांतला ‘पानी’ चित्रत्रपटाची आँफर करणाऱ्या शेखर कपूर यांना पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्वात पहिल्यांदा शेखर यांनी त्यांला ट्विटरवर श्रद्धांजली दिल्याची ही चर्चा आहे.  मात्र कोरोनामुळे शेखर हे सध्या उत्तरखंड येथे अडकून पडल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी त्यांना चौकशीला बोलावले असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी स्वत: जबाब लिहून पोलिसांना मेल केल्याचे सांगितले जात.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा