हरवलेला मुलगा घरी परतला

 Cheetah Camp
हरवलेला मुलगा घरी परतला
हरवलेला मुलगा घरी परतला
हरवलेला मुलगा घरी परतला
See all

ट्रॉम्बे - ट्रॉम्बे पोलिसांना परिसरातील रिक्षा स्टॅन्डवर बुधवारी सकाळी तीन वर्षांचा अनोळखी मुलगा सापडला. मुलगा घाबरलेला असल्याने त्याला त्याचे नाव आणि पत्ता देखील सांगता येत नव्हता. या मुलाच्या कुटुंबियांना शोधण्यासाठी मीनल पाटील आणि मयुरी खिलारे या दोन महिला पोलीस शिपाई निघाल्या. दरम्यान, येथील चित्ता कॅम्प परिसरात जाताच मुलाने एका चाळीकडे इशारा केला. त्यानुसार त्याला त्याठिकाणी नेलं असता एका घरात हा मुलगा गेला. पोलिसांनी खात्री करुन घेतल्यानंतर शबनम काझी या त्याच्या आईकडे मुलाला सुपूर्द केलं. मुलीला शाळेत सोडायला गेली असताना मुलगा हात सोडून गेल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. बराच वेळ शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याचा फोटो शोधण्यासाठी शबनम घरी आली होती. मात्र, त्याअगोदरच मुलगा पोलिसांच्या मदतीने घरी पोहोचला. मुलगा सापडल्यानंतर शबनमने पोलिसांचे आभार मानले.

Loading Comments