सुकापाशा विरोधात पोलिस आरोपपत्र दाखल करणार


सुकापाशा विरोधात पोलिस आरोपपत्र दाखल करणार
SHARES

नाशिक शस्त्रास्त्र प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी बद्रीजुम्मन अकबर बादशाह उर्फ सुका पाशा याच्या विरोधात लवकरच पोलिस न्यायालयात आरोपपत्र सादर करणार आहेत. अंदाजे चारशे ते पाचशे पानी आरोपपत्रात पोलिसांनी सुका विरोधात १३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. सध्या सुकाचा ताबा मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांकडे आहे.


शस्त्रविक्रीच्या दुकानावर दरोडा

जानेवारीत सुका पाशाने अापल्या साथीदारांसह उत्तर प्रदेशमध्ये शस्त्रविक्री करणाऱ्या दुकानावर दरोडा टाकत २२ रायफल्स, १७ रिव्हाॅल्वर आणि चार हजार १४२ काडतुसं चोरली होती. ही शस्त्रास्त्र मुंबईत आपल्या साथीदारांना देऊन मुंबईवर ताबा मिळवण्याचा त्याचा कट होता. मात्र, त्यापूर्वीच नाशिक पोलिसांनी त्याचे मनसुबे उधळून लावत त्याला अटक केली.


दहशतीसाठी मागितली खंडणी

कालांतराने सुकाचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात आला. सुका पाशावर ३० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सुकाच्या अटकेनंतर शिवडीच्या आर. ए. किडवाई पोलिस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचे दोन गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शिवडी परिसरात राहणाऱ्या सुकापाशा व त्याचा बाप अकबर पाशाने यापूर्वीच्या गुन्ह्यांत जेलमधून बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची उधळण केली होती. हा खर्च भागवण्यासाठी आणि परिसरात दहशत बसवण्यासाठी सुका पाशाने त्याच परिसरातील एका व्यक्तीकडे ५ लाखाची खंडणी मागितली होती. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्याने सुका पाशा आणि त्याचा बाप अकबरने दुकानावर जाऊन बंदूक दाखवत त्याला धमकावले होते. याबाबत त्या व्यावसायिकाने आरएके पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला होता.


सुकाविरोधात १३ जणांचे जबाब

त्यानुसार पोलिसांनी सुकासह त्याच्या इतर साथीदारांवर मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवला.
दरम्यान, या गुन्ह्यात पोलिस आता सुका आणि त्याच्यासोबतच्या आरोपींविरोधात 26 मार्च रोजी आरोपपत्र दाखल करणार आहेत. या आरोपपत्रात पोलिसांनी शस्त्रास्त्र उल्लंघन, चोरी, फसवणूक, खंडणीसह संघटित गुन्हेगारीचे आरोप असलेल्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. तसेच, या गुन्ह्यांच्या माहितीसह पोलिसांनी सुका विरोधात १३ जणांचे जबाब नोंदवला आहेत. एकूण चारशे ते पाचशेपानांचे हे आरोपपत्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



हेही वाचा

सुकापाशाच्या बापालाही खंडणीच्या गुन्ह्यात अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा