अभिनेत्रीला अश्लिल व्हिडिओ काॅल, वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

. गेल्या वर्षीही या अभिनेत्रीला असाच अनुभव आला असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

अभिनेत्रीला अश्लिल व्हिडिओ काॅल, वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
SHARES

मुंबईत एका अभिनेत्रीला व्हाँट्स अँप काँलकरून तिच्यासमोर एक विकृत हस्तमैथुन करत, लैगिक छळ करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीने स्वत: मुंबई पोलिसांना टॅग करत त्या व्यक्तीचे मेसेजेस व व्हिडीओचे स्क्रीनशॉट ट्विट करायला सुरूवात केली. गेल्या वर्षीही या अभिनेत्रीला असाच अनुभव आला असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचाः- अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, पावसाबाबत IMD चा मुंबईकरांना इशारा

मुंबईत राहणाऱ्या या अभिनेत्रीचा मागील अनेक दिवसांपासून एक विकृत सोशल मिडियावर पाठलाग करत असल्याचा संशय तिला आहे. शुक्रवारी सकाळी अभिनेत्रीला एक वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. तिला एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. या पूर्वीदही तिला अज्ञात व्हाँट्स अँप काँल येत होते. मात्र त्या दिवशी आलेल्या फोनने अभिनेत्रीच्या मनात कायमचीच धडकी भरली. शुक्रवारी, यूके देशाचा कोड असलेल्या नंबरवरून दोनदा तिला व्हिडिओ कॉल आला मात्र तिने तो घेतला नाही. मात्र तिसऱ्यांदा चुकून तो कॉल घेतला व समोर दिसलेली घटना पाहून तिला धक्काच बसला. त्या व्हिडिओ कॉलवर समोरची व्यक्ती चक्क हस्तमैथुन करीत असल्याचे तिला दिसले. ते पाहून तिने आपला चेहरा दिसून नये म्हणून ताबडतोब फोनचा कॅमेरा झाला व त्यानंतर पुरावा म्हणून तिने काही स्क्रीनशॉट घेतले. त्यानंतर त्या व्यक्तीने तिला मेसेजस पाठवायला सुरुवात केली आणि तिला तिच्या नावानेही संबोधित केले. यानंतर अभिनेत्रीने मुंबई पोलिसांना टॅग करत त्या व्यक्तीचे मेसेजेस व व्हिडीओचे स्क्रीनशॉट ट्विट करायला सुरूवात केली.

हेही वाचाः- प्रताप सरनाईक हाजीर हो...! ईडीकडून पुन्हा बोलावणं

समोरील व्यक्तीला आपण चुकल्याची जाणीव झाल्यानंतर त्याने माफी मागायला सुरुवात केली, त्याने कुणी तरी आपल्या नावाने व्हिडिओ काँल करून हे कत्य करत असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने वर्सोवा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा