परमबीर सिंग यांना १५ जूनपर्यंत अटक नाही

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार भिमराज घाडगे यांनी केली आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

परमबीर सिंग यांना १५ जूनपर्यंत अटक नाही
SHARES

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( param bir singh) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांची अटक १५ जूनपर्यंत टळली आहे. परमबीर सिंह यांना १५ जूनपर्यंत ॲट्रॉसिटी (Atrocity) च्या प्रकरणात अटक करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दिली. तसंच आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार केली आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार भिमराज घाडगे यांनी केली आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे गुरूवारी यावर ऑनलाईन सुनावणी झाली. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे आणि परमबीर सिंह यांच्या मतभेद असतीलही मात्र त्याचा इथे काहीही संबंध नाही. दाखल केलेल्या तक्रारीत तथ्य वाटले म्हणूनच ही कारवाई केली, असा खुलासा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.

परमबीर सिंह यांना याआधी झालेल्या सुनावणीत ९ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं होतं. त्यानंतर गुरूवारी त्यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. आता १५ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

पुढचे ३ दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा