डीएसके दाम्पत्याला अंतरिम जामीन


डीएसके दाम्पत्याला अंतरिम जामीन
SHARES

शेकडो ठेवीदारांची कोटयावधीं रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले नामांकीत बिल्डर डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा देत एक आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.


जामीनासाठी अटी

अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी देखील घातल्या आहेत. डी.एस. कुलकर्णी शहर सोडून जाऊ शकत नाहीत. त्याच बरोबर तपास यंत्रणांना सहकार्य करणे देखील त्यांना बंधनकारक असणार आहे. पुढील सुनावाणी दरम्यान जामिनासाठी ठोस प्रस्ताव घेऊन येण्यास देखील उच्च न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांच्या वकिलांना बजावलं आहे.


काय आहे प्रकरण?

डी.एस कुलकर्णी विरोधात पुणे, मुंबई आणि कोल्हापुरातून तक्रारी समोर आल्याने या प्रकारणाची व्याप्ती चांगलीच वाढली आहे. चांगला परतावा मिळेल या आशेने शेकडो ठेवीदारांनी डीएसके यांच्या गुंतवणूक योजनेत कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक केली होती. मात्र मागील काही काळापासून त्यांना परतावा मिळणे बंद झाल्याने ठेवीदार धास्तावले. याबाबत डीएसकेकडून काही आश्वासक उत्तर न मिळाल्याने ठेवीदारांनी शेवटी पोलिसांकडे दाद मागितली. या योजनेत ३४० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं म्हटलं जात आहे.


पहिला अर्ज फेटाळला

या प्रकरणी डीएसके यांनी पुण्याच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने डीएसकेचा अटकपूर्ण जामीन फेटाळल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रत्येकी १ लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने डीएसके दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.



हेही वाचा-

वाडीबंदरमध्ये ५ लाखांच्या बनावट नोटा जप्त

मौजमजेसाठी ही लहान मुलं करायची दुचाक्यांची चोरी!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा