डीआयजी मोरे निलंबीत, बेपत्ता मुलीचा शोध सुरूच


डीआयजी मोरे निलंबीत, बेपत्ता मुलीचा शोध सुरूच
SHARES

राज्याच्या गृह विभागाने अखेर वाहतूक विभागातील पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) निशिकांत मोरे यांना पदावरून निलंबीत केलं आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरे यांच्यावर आरोप आहे. 

दिवसभरात मोरे यांना बसलेला हा दुसरा झटका आहे. कारण याआधी मोरे यांनी पनवेल न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांची अटक अटळ आहे. तर दुसरीकडे या पीडित मुलीच्या कुटुंबियांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील ड्रायव्हर दिनकर साळवी यालाही निलंबीत करण्यात आलं आहे.

हेही वाचा- एजाज लकडावाला 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण सर्वात पहिल्यांदा २६ डिसेंबर २०१९ रोजी उघडकीस आलं होतं. तळोजा पोलिस स्थानकात एका अल्पवयीन मुलीने मोरे यांच्याविरोधात पाॅक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला. पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार ५ जून रोजी एका कौटुंबिक कार्यक्रमात डीआयजी मोरे यांनी पीडित मुलीच्या चेहऱ्यावर केक लावल्यानंतर तिच्यासोबत अश्लील वर्तन केलं होतं. घडलेल्या प्रकारानंतर ६ महिन्यांनी पीडित मुलगी पोलिसांत गेली होती. 

हे प्रकरण माध्यमात आल्यानंतर तक्रार दाखल करणारी पीडित मुलगी सोमवारपासून आपल्या मुंबईतील घरातून बेपत्ता झाली आहे. तिच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली असून तिच्या घरी सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली आहे. डीआयजीच्या वाढत्या दबावामुळे आत्महत्या करत असल्याचं तिने या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

बेपत्ता मुलीच्या शोधकार्यात ६० पोलिसांना लावण्यात आलं आहे. डीआयजी मोरे सध्या पुण्यातील वाहतूक विभागात कार्यरत आहेत. आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

हेही वाचा- नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी केल्याने तरूणाचा खून

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा