सायबर चोरट्यांनी निवृत्त बँक मॅनेजरलाच घातला गंडा

सावधान... डेबिट कार्डची माहिती कुणालाही देण्याआधी दहावेळा विचार करा. कारण तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे गैरव्यवहार केला जाऊ शकतो. त्यामुळे कुठूनही फोन आला तरी आपल्या डेबिट किंवा बँकेशी निगडीत कुठलीही माहिती देऊ नये. नाहीतर सुरेश यांच्यासारखं तुम्हीही फसवले जाऊ शकता.

सायबर चोरट्यांनी निवृत्त बँक मॅनेजरलाच घातला गंडा
SHARES

मालाड परिसरात राहणाऱ्या निवृत्त बँक मॅनेजरची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. बँक मॅनेजरच्या डेबीट कार्डची माहिती काढून २൦ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र बँक मॅनेजरच्या कार्डला लिमिटेड पैसे काढता येण्याची अट असल्यानं अधिक नुकसान झाले नाही. या प्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

काय आहे प्रकार?

मालाडच्या एस. व्ही. रोड इथल्या डाँ ग्रँम्ब्रस रेसिडेन्सीत राहत असलेले सूरेश सावंत (69) हे राष्ट्रीय बँकेत मॅनेजर पदावरून निवृत झाले होते. 10 जानेवारी 2019 रोजी सूरेश यांना एक निनावी फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्ती आपण स्टेट बँकेतील चिफ मॅनेजर बोलत असल्याचं त्यानं सांगितलं. तसंच तुम्हचे जुने डेबीट कार्ड बंद करण्यात येणार असून तुम्हाला नवीन चिप असलेले डेबीटकार्ड दिले जाणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे नवीन कार्डसाठी तुमच्या जुन्या कार्डवरील माहिती जाणून घेणं आमच्यासाठी आवश्यक असल्याचं सूरेश यांना सांगण्यात आलं. सूरेश यांनी कुठलीच पडताळणी न करता कार्डची सर्व माहिती या भामट्यांना दिली. त्यानंतर काही वेळातच सूरेश यांच्या खात्यातून दोन टप्यात २൦ हजार रुपये काढण्यात आले

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सूरेश यांनी त्या नंबरवर पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र समोरील व्यक्तीचा फोन बंद येत होता. ते सायबर चोर त्यानंतर ही वेळोवेळी पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सूरेश यांनी त्याच्या कार्डमधून दिवसाला फक्त 15 हजार रुपयेच काढता येऊ शकतात, अशी अट ठेवली होती. ही अट ठेवल्यामुळेच त्यांचे मोठे नुकसान होण्यापासून राहिले. या प्रकरणी सूरेश यांनी मालाड पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत


हेही वाचा

भारतातील चोरीचे मोबाइल नेपाळ-बांग्लादेशमध्ये विक्रीला

फ्लॅटचं आमीष दाखवून चूना लावणारे अटकेत


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा