ईडीच्या 'या' प्रश्नांची उत्तर रियाला देता आली नाहीत

चौकशीत सुशांत आणि रिया या दोघांनी एक कंपनी उघडल्याचेही बोलले जाते. ज्याचे डोमेन आणि आयपी पत्ता रियाने सुशांतच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदा २३ जूनला आणि दुसऱ्यांदा ७ आँगस्टला बदलला होता

ईडीच्या 'या' प्रश्नांची उत्तर रियाला देता आली नाहीत
SHARES

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सोमवारी पुन्हा ईडीने चौकशी केली. रिया, तिचा भाऊ शौविक आणि रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांची सुमारे १० तास चौकशी केली. रिया चक्रवर्ती यांचे उत्पन्न आणि इतरबाबी यावेळी समोर आल्या, परंतु ईडीच्या अधिकाऱ्यांची काही प्रश्नांची उत्तरे देण्यात ती अपयशी ठरली.

हेही वाचाः- हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान

मुंबईच्या ईडी आॅफिसमधून सुशांत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिच्या घरातल्यांची ईडीने चौकशी केली. तब्बल १० तास ईडीकडून रिया, रियाचा भाऊ शौविक आणि रियाचे वडिल यांची चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जाते. ईडीच्या चौकशीत तिने सुशांतच्या काही व्यवहार तिने हस्तक्षेप केल्याचे उघडकिस आले आहे. ईडीने  रिया चक्रवर्तीने प्राॅपर्टी आणि रिअल इस्टेटमध्ये जो पैसा गुंतवला आहे. त्याबाबत रियाकडे चौकशी केली. मात्र त्याची विस्तृत उत्तर देण्यास रियाने टाळल्याचे कळते. तसेच तिने तिची आईटीआर स्टेटमेंट तपास अधिकाऱ्यांना दिली. त्यातही तपास अधिकाऱ्यांना तिने दिलेली उत्तर आणि स्टेटमेंटमध्ये तफावत आढळून आली. रियाने २०१७-१८ मध्ये १८.७५ लाख तिची कमाई दाखवलेली आहे. तर २०१८-१९ मध्ये तिने १८.२३ लाख वार्षिक कमाई दाखवली आहे.

हेही वाचाः- भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

असे सांगितले जाते या दोन वर्षात तिने जे तिचे आर्थिक उत्पन्न दाखवले आहे. त्यापेक्षा जास्त तिने कमवले आहेत. यातून सिद्ध होते की, रियाने आईटीआरमध्ये चुकीचे उत्पन्न दाखवले आहे. रियाकडे दोन आलिशान घर आहेत. एक फ्लॅट तिने २०१८ मध्ये खार परिसरात विकत घेतले. ज्याची किंमत ८० लाख असल्याचे कळते. तर दुसरं घर तिने तिच्या वडिलांच्या नावाने २०१२ मध्ये घेतलं होतं.ज्याची किंमत ६० लाखांच्या आसपास आहे. या अहवालानुसार रिया चक्रवर्ती यांचे एकूण उत्पन्न काही वर्षांत १० लाख रुपयांवरून १४ लाख रुपयांवर गेले आहे, ज्यामध्ये ईडीने त्यांना आरटीआरचे निवेदन मागितले होते. रिया चक्रवर्ती यांनी अद्याप तिच्या आईटीआरबद्दल ईडीला कोणतीही माहिती दिली नव्हती, पण आता तिचे उत्पन्न आईटीआर सोपविल्यानंतर उघडकीस आले आहे. रियाच्या चौकशीत  सुशांत आणि रिया या दोघांनी एक कंपनी उघडल्याचेही बोलले जाते. ज्याचे डोमेन आणि आयपी पत्ता रियाने सुशांतच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदा २३ जूनला आणि दुसऱ्यांदा ७ आँगस्टला बदलला होता.

हेही वाचाः- Ganesh Utsav 2020 : कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीची 'ही' नवी अट

रियाने तिच्या वार्षिक उत्पन्नातून ७६ लाखांचे शेअर्स कसे घेतले. त्याच बरोबर तिच्यावर सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. या सर्व आरोपांना धरून ईडीला अद्याप रिया विरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. तर दुसरीकडे मिडिया ट्रायल विरोधात रियाने सुप्रीम कोर्टात पून्हा धाव घेतली आहे.  सुशांत आत्महत्या प्रकरणात तिला मिडियाकडून दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा