Advertisement

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

किरीट सोमय्या यांनीच ट्विटकरून सांगितले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आतातर एकामागोमाग एक लोकप्रतिनिधीही या पासून वाचलेले नाहीत. भाजपचे नेते भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी डाँ. मेधा सोमय्या यांना आता कोरोनाची लागण झाल्याचे किरीट सोमय्या यांनीच ट्विटकरून सांगितले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत ज्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यावेळी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किरीट सोमय्या हे मुंबईतील विविध भागात जात होते. रुग्णांना मिळणाऱ्या गैरसोईवरूनही त्यांनी अनेकदा सरकारवर टिकाही केली. बहुदा याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोरोनाची लक्षणे वाटू लागल्यानंतर त्यांनी त्यांची आणि कुटुंबियांची वैद्यकिय तपासणी केली. त्यावेळी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी डाँ मेघा सोमय्या यांचा अहवाल पाँझिटिव्ह आल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विटरहून दिली. तसेच आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचाः-IAS officers transfer: मिलिंद म्हैसकर यांच्यासह ५ अधिकाऱ्यांची बदली

मात्र कोरोनाची लागण झालेले किरीट सोमय्या हे पहिले लोकप्रतिनिधी नाहीत. या पूर्वी अनेक लोकप्रतिनिधींना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामानिमित्त मतदारसंघात वा जनतेमध्ये फिरत आहेत. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. त्यामुळंच लोकप्रतिनिधांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचाः- ३० सप्टेंबरपर्यंत लोकल, मेल-एक्स्प्रेस सेवा बंद? रेल्वेने केला खुलासा


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा