प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाज सिद्दीकीला जन्मठेप


प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाज सिद्दीकीला जन्मठेप
SHARES

बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्येप्रकरणी मुंबईच्या टाडा न्यायालयाने दोषी रियाज सिद्दीकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे या हत्येत रियाज सिद्दीकीला सरकारी पक्षाने माफीचा साक्षीदार केले होते. मात्र त्याने त्याची साक्षी बदलल्याने त्याला पुन्हा आरोपी करण्यात आले होते.

सात मार्च १९९५ साली बांधकाम व्यावसायिक असलेल्या प्रदीप जैन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणी याआधी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह वीरेंद्रकुमार झांब मेहंदी हसन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

प्रदीप जैन हत्येच्या कटात सामील झाल्याचा ठपका हा रियाज सिद्दीकीवर ठेवण्यात आला होता. मात्र सुनावणीदरम्यान रियाज सिद्दीकी हा माफीचा साक्षीदार झाला होता. मात्र त्यानंतर त्याने आपली साक्ष फिरवल्याने त्याला पुन्हा एकदा आरोपी करण्यात आले होते. याप्रकरणी सिद्दीकीला याआधीच दोषी ठरवण्यात आले होते आणि मंगळवारी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

रियाज सिद्दीकी हा १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकणातील दोषी असून त्याला सात सप्टेंबरला विशेष टाडा न्यायालायाने इतर पाच दोषींसह १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याने १० वर्षांहून अधिक काळ जेलमध्ये काढल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र प्रदीप जैन हत्येप्रकरणी जन्मठेप लागल्याने आता त्याला त्याचे उर्वरित आयुष्य कारागृहातच काढावे लागणार आहे.


हेही वाचा - 

अबू सालेमला जन्मठेप, तर दोघांना फाशी


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा