सराईत दरोडेखोर जेरबंद

 Pali Hill
सराईत दरोडेखोर जेरबंद
सराईत दरोडेखोर जेरबंद
See all

मुंबई - मुंबई गुन्हे शाखेने सराईत दरोडेखोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय. ही टोळी मुंबईसह, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सक्रिय होती. गुन्हे शाखा क्रमांक ९ ने या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून एक कट्टा, काडतूस, तीन लाखांचं ऑस्ट्रेलियन चलन आणि पल्सर बाईक जप्त केलीय. काही दिवसांपूर्वीच या टोळीने बेलापूर, नवी मुंबई परिसरात चाकूचा धाक दाखवून एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरात दरोडा टाकला होता. शुक्रवारी गुन्हे शाखेला या टोळीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेनं सापळा रचला. त्यानंतर आरोपी विनोद वैष्णवसह असरुद्दिन खान, हिम्मत सिंग, आणि रॉनी लोबो यांना अटक करण्यात आली. खूनाचा प्रयत्न, दरोडे आणि गाड्यांच्या चोऱ्यांच्या कित्येक प्रकरणात पोलीस या टोळीच्या शोधात होती.

Loading Comments