सावधान, हाॅटेलमध्ये होतेय एटीएम कार्डच्या क्लोनिंगद्वारे लूट


सावधान, हाॅटेलमध्ये होतेय एटीएम कार्डच्या क्लोनिंगद्वारे लूट
SHARES

हाॅटेलच्या वेटरकडे कार्ड स्वॅप करण्यासाठी देत असाल तर सावधान! मोठ्या शहरातील हाॅटेल्समध्ये कार्यरत असणाऱ्या वेटरकडून ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून बनावट एटीएमद्वारे ग्राहकांचे पैसे लुटणाऱ्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करण सुरेश टंडन (३२), मारुती बर्मा गुडाजी (२४) अशी अटक आरोपींची नावं आहेत. यातील एक आरोपी तुकाराम गुडाजी हा अद्याप फरार असून मुलुंड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


अशी ठरवली योजना

कुर्लाच्या हनुमान मंदिर परिसरात राहणारा करण हा विक्रोळीच्या पार्कसाईट इथल्या एका हाॅटेलमध्ये कामाला होता. हाॅटेलमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक बिल भागवण्यासाठी त्याच्याकडे कार्ड आणि एटीएम पिन नंबर द्यायचे. अशातच वाकोल्यातील एका वेटरनं कार्ड क्लोनिंगद्वारे ग्राहकाला गंडा घातल्याची बातमी करणनं वाचली. त्यानुसार झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यानेही൦ अशा प्रकारे चोरी करण्याचे ठरवले. मात्र ग्राहकांचे कार्ड आणि पिन क्रमांक चोरल्यास लवकर पकडले जाण्याची शक्यता होती. त्यानंतर पेपरमधील कार्ड क्लोनिंगच्या वाढत्या घटना आणि या प्रकरणाचा अभ्यास करून त्याने कार्ड क्लोनिंग करून बनावट कार्डच्या मदतीने चोरी करण्याचे ठरवले.


असे बसवले स्किमर

एटीएमचे कार्ड आपण ज्या ठिकाणी मशीनमध्ये टाकतो, त्या ठिकाणी स्किमर लावून आपल्या डोक्याच्या वर पिन नंबर पाहण्यासाठी हे चोर एक छोटासा कॅमेरा लावतात. डेटा चोरी केल्यानंतर त्याचे संकलन करून हुबेहुब दुसरे एटीएम कार्ड बनवले जाते.


अनेक ग्राहकांना घातला गंडा

अशापद्धतीने करण हाॅटेलजवळील एटीएममध्ये कार्ड क्लोनिंग मशीन लावून करण पैसे काढायला येणाऱ्या ग्राहकांचा डेटा चोरायचा. हा चोरलेला डेटा तो तुकाराम गुडाजी याला देऊन बनावट कार्ड बनवायचा. त्यानंतर मारुती गुडाजीला देऊन ते ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढायचे. या फसवणुकीस बळी पडलेल्या एका तरुणीने याप्रकरणी मे महिन्यात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत करणला ७ मे रोजी अटक केली. करणच्या चौकशीतूनच पोलिस मारुती गुडाजीपर्यंत पोहोचले. रविवारी सकाळी पोलिसांनी मारूतीला अटक केली आहे.


हेही वाचा -

गँगस्टर रवी पुजारीकडून पुन्हा व्यावसायिकाला धमकी

मांडूळ साप विकणाऱ्या दोघांना अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा