चोरी पडली भारी

 Dahisar
चोरी पडली भारी

दहिसर - वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर प्रयत्न चोरीचा दुचाकीवरून आलेल्या चोरांना महागात पडला. दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला लुटण्याच्या प्रयत्नात हे चोरटे रस्त्यावर पडले. या चोरांना दहिसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तावडे यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली. 10 ऑक्टोबर रोजी रात्री घोडबंदर येथील कंपनीत काम करणारे दत्ताराम तांबे आणि महेंद्र हे 5.33 लाख रुपयांची बॅग घेऊन निघाले होते. ते रावळपाडा ब्रिज येथे आले असता मागून दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्याकडील बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र महेंद्र यांनी बॅग घट्ट पकडून ठेवल्याने तिघेही चोरटे रस्त्यावर पडले. यापैकी दोन चोरट्यांना तेथे असलेल्या वाहतूक पोलिसांनी पकडले. तर एका चोराने पळण्याच्या नादात ब्रिजवरून उडी मारली. त्यात त्याचे दोन्ही पाय मोडले.

या प्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजेश पनिकर, जावेद, विनायक यादव आणि सनी गुप्ता यांना अटक केली आहे. पैकी सनीचे पाय मोडल्याने त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading Comments