रेल्वेच्या महिला डब्यात चढलेल्या कुत्र्याला आरपीएफकडून मारहाण


रेल्वेच्या महिला डब्यात चढलेल्या कुत्र्याला आरपीएफकडून मारहाण
SHARES

अनेकदा गर्दुल्ले महिलांच्या डब्यात चढून त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात अनेकदा असमर्थ ठरलेल्या रेल्वेच्या ४ पोलिसांनी एक कुत्रा महिलांच्या डब्यात चढला म्हणून त्याला जबर मारहाण केली आहे. मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट विरारदरम्यान ही घटना घडली.
त्या कुत्र्याला वाचवणारे प्राणीमित्र आणि पशुवैद्य यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, त्या कुत्र्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता.


प्रवासी अॅना भुतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार 

प्रवासी आणि प्राणीमित्र अॅना भुतानी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार 'मी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अंधेरी स्टेशवर होते. तेव्हा मला कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी जेव्हा बघितले तेव्हा फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात एक कुत्रा चढला होता. त्या कुत्र्याला खाली उतरवण्यासाठी रेल्वेचे पोलीस त्याला मारहाण करत होते. तो कुत्रा खूप घाबरला होता. तो बाहेर येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत सोडून निघून गेले.'


पुढे काय झाले?

'मी भाइंदर स्थानकात पोहचल्यानंतर यासंदर्भात प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या रामानुग्रह या संस्थेला सांगितलं. तेव्हा त्या संस्थेचे सदस्य असलेले ओमकार राणे यांनी भाईंदर रेल्वे स्टेशनवर येत त्यांनी त्या कुत्र्याला खाली उतरवले. ओमकार राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 'मारहाणीमुळे कुत्र्याला गंभीर दुखापत झाली होती. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत'.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा