COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

बहिणीच्या प्रेमापोटी काहीही करू शकतो, भावाचं प्रेम पाहून पोलिसही गहिवरले

काही तास उलटत नाही तोच लहान बहिणीने आई आणि वडिलांच्या आठवणीने हंबरडा फोडला. बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नसल्याने वर्षीय तो अल्पवयीन मुलगा बहिणीला घेऊन घराबाहेर पडला. कळवा स्थानकावरून त्याने दादरच्या दिशेने लोकल पकडली.

बहिणीच्या प्रेमापोटी काहीही करू शकतो, भावाचं प्रेम पाहून पोलिसही गहिवरले
SHARES

"मी माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यासाठी काहीही करू शकतो" हे वाक्य एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं आहे. मुंबईच्या दादर स्थानकावर २४ मार्च रोजी अल्पवयीन बहिण - भावामधील एक अनोखं नातं आरपीएफच्या जवानांनी पाहिलं. बहिणीचा वडिलांकडे जाण्याचा हट्ट पुरवण्याच्या नादात रस्ता विसरलेले हे बहिण-भाऊ सुदैवाने आरपीएफ जवानांच्या हाती लागले. लहान बहिणीसाठी मोठ्या भावाच्या मनात असलेले प्रेम पाहून पोलिसही गहिवरले.  


फळविक्रीचा व्यवसाय

कळवाच्या भास्कर नगर परिसरातील सरस्वती चाळीत अल्पवयीन १४ वर्षीय भाऊ आणि ६ वर्षाची त्याची लहान बहीण आई-वडिलांसोबत राहतात. अत्यंत गरीब कुटुंबातील या मुलांचे वडील चर्चगेट स्थानकाबाहेर फळविक्रीचा व्यवसाय करतात. हातावरचे पोट असल्यामुळे वडील पहाटेच घर सोडतात. २४ मार्च रोजी या मुलांची आई कौटुंबिक कामानिमित्त मुंबई बाहेर गेली होती. तर वडील नेहमीप्रमाणे कामासाठी सकाळीच घराबाहेर पडले होते. मात्र घराबाहेर पडताना त्यांंनी  मुलाला आपल्या लहान बहिणीचा काळजी घेण्यास सांगून घर सोडले होते.


बहिणीचा हंबरडा

 काही तास उलटत नाही तोच लहान बहिणीने आई आणि वडिलांच्या आठवणीने हंबरडा फोडला. बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नसल्याने वर्षीय तो अल्पवयीन मुलगा बहिणीला घेऊन घराबाहेर पडला. कळवा स्थानकावरून त्याने दादरच्या दिशेने लोकल पकडली. मात्र दादर येथे लोकल बदलावी लागत असल्याने तो ६ नंबर फलाटावर उतरला. मात्र, दादरच्या गर्दीत तो वाट चुकला. या दोघांवर तेथे गस्त घालत असलेल्या आरपीएफच्या महिला पोलिस उपनिरीक्षक रेखा मिश्रा यांची नजर पडली. वाट चुकलेल्या मोठ्या भावाच्या चेहरा चिंतेने घामाघुम झाला होता. मात्र बहीण हरवू नये म्हणून तिचा हात त्याने घट्ट धरला होता. 


तिच्या प्रेमापोटी...

महिला अधिकाऱ्यांनी दोघांकडे विचारपूस केल्यानंतर मोठ्याा भावाने वाट चुकल्याचं सांगितलं.  तसंच मोठ्या भावाच्या खिशात मोबाइल असल्याने पोलिसांनी वडिलांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं. अर्धा पाऊण तासाच वडील आरपीएफ चौकीत आल्याानंतर पोलिसांंनी मुलांना वडिलांच्या हवाली केले. तसंच या पुढे असे न करण्याची ताकीदही दिली. मात्र त्यावेळी त्या अल्पवयीन भावानेे "मी माझा बहिणीच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही, तिच्या प्रेमापोटी मला असे पुन्हा करावे लागल्यास मी पुन्हा करेन हे उत्तर दिले. बहिणीसाठी भावाच्या मनात असलेले प्रेम पाहून पोलिस कर्मचाऱ्यांच्या मनालाही पाझर फुटला. दोघेही उपाशी असल्यामुळे दोघांना जेवण करून त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केल्याची माहिती दादर आरपीएफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश मेनन यांनी  दिली.हेही वाचा -

अनाथ आश्रमाला दान करा, तरच मिळेल जामीन, बारबालांवर पैसे उधळणाऱ्यांना न्यायालयाची अनोखी शिक्षा

डीएमके पक्षाच्या प्रवक्त्याची हत्या करणाऱ्यास अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा