धक्कादायक! मोठ्यांच्या भांडणातून ४ वर्षाच्या चिमुकल्याची गळा आवळून हत्या

क्रूरतेचा कहर म्हणजे श्रेयस आरडा ओरडा करू लागल्यामुळे कदमने त्याचे तोंड पाण्यात बुडवून ठार मारले.

धक्कादायक! मोठ्यांच्या भांडणातून ४ वर्षाच्या चिमुकल्याची गळा आवळून हत्या
SHARES

मुंबईच्या सहार परिसरात पूर्व वैमन्यस्यातून बहिणीच्याचं मुलाचा पायजम्याने गळा आवळून हत्या केल्याची घटना  घडली आहे . या प्रकरणी सहार पोलिसांनी मधु गाडे (३६) हिला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचाः- Terrorist threat मुंबईत हाय अलर्ट, दहशतवाद्यांच्या धमकीनंतर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

अंधेरीच्या सहार रोड परिसरात संतोषी माता नगर परिसरात जयश्री अमोल कदम या आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. तर त्यांच्या घराशोजारीच आरोपी मधु संजय गाडे या राहतात. हे दोघेही नात्याने मावस नणंदभावजई आहेत. मात्र काही कारणांवरून दोघांमधील संबध हे बिघडलेले होते. यातून दोघींमद्ये एकमेकांविषयी कटूता होती. यातूनच कदम कुटुंबियांना धडा शिकवण्यासाठी गाडे हिने घरासमोर खेळत असलेल्या कदम यांच्या ४ वर्षाच्या मुलगा श्रयेसला घरात बोलवून घेतले.  त्यानंतर तिने लेगीजने श्रेयसचा गळा आवळला. क्रूरतेचा कहर म्हणजे श्रेयस आरडा ओरडा करू लागल्यामुळे कदमने त्याचे तोंड पाण्यात बुडवून ठार मारले.

 हेही वाचाः- मुंबईत २ दिवसात २३ हजार गाड्या पोलिसांनी केल्या जप्त

दरम्यान जयश्री या श्रेयस घराबाहेर दिसत नसल्यामुळे त्याचा  शोध घेऊ लागल्या, त्यावेळी शेजाऱ्यांनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला मात्र श्रेयस दिसून येत नव्हता. अशातच मधुचा दरवाजा बंद असल्याने निदर्शनास आल्यानंतर जयश्रीने तिचा दरवाजा ठोकवला असता. मधुने  दरवाजा उघडला असता जयश्रीने तिच्याजवळ श्रेयसबाबत विचारणा केली. त्यावेळी मधुने तिला घरात घेतले नाही. जयश्रीने जबरदस्ती घरात प्रवेश केला असता. श्रेयसचा मृतदेह घराच्या  बाथरूममध्ये आढळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मधु विरोधात भा.द.वि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदवून तिला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय