शिवाजी पार्क येथील हत्येतील तिसऱ्या आरोपीला अटक

मुंबईच्या दादर चौपाटीवर देवी विसर्जनावेळी मानखुर्द येथील जय भवानी महिला उत्सव मंडळ आणि धारावी येथील जय अंबे मित्र मंडळात वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, शाब्दीक भांडण हाणामारीवर पोहचले.

शिवाजी पार्क येथील हत्येतील तिसऱ्या आरोपीला अटक
SHARES

मागील गुरूवारी देवी विसर्जनावेळी झालेल्या जगदीश कदमच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपी समीर नासीर शेख (२१) याला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. नासीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद शाहू नगर पोलिस ठाण्यात आहे.


काचेच्या तुकड्याने वार 

मुंबईच्या दादर चौपाटीवर देवी विसर्जनावेळी मानखुर्द येथील जय भवानी महिला उत्सव मंडळ आणि धारावी येथील जय अंबे मित्र मंडळात वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, शाब्दीक भांडण हाणामारीवर पोहचले. या वादात जय भवानी महिला उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जगदीश नंदू कदम याला जय अंबे मित्र मंडळाच्या अविनाश अशोक नलावडे (१९), रँपर उर्फ समीर नासीर शेख आणि स्टॅलिन यशवंत पुजारी (१९) यांनी बेदम मारहाण करत बिअरची बाटली फोडून काचेच्या तुकड्याने कदमवर वार केले होते.


इतर गुन्ह्यांत फरार

 घटनास्थळी शिवाजी पार्क पोलिसांचे पथक पोहचून त्यांनी गंभीर जखमी झालेल्या जगदीशला केईएम रुग्णालयात दाखल केले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अविनाश आणि स्टॅलिनला भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा नोंदवून अटक केली होती. हत्येनंतर समीर हा फारार झाला होता. शाहू नगर पोलिस ठाण्यात समीर विरोधात तीन गुन्ह्यांची नोंद असून या गुन्ह्यांत तो फरार होता. शाहू नगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याला अटक केली. त्यानंतर शाहू नगर पोलिसांनी त्याचा ताबा शिवाजी पार्क पोलिसांना दिला. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा - 

पाकिस्तानी मुलीच्या प्रेमासाठी त्याने घर सोडलं

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय तरुणाला चोपलं, तिघांना अटक

क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा