बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या स्क्रिप्ट रायटरला अटक

देशात लोकसभा निवडणुकीनं राजकीय वातावरण तापलेलं असताना. बनावट नोटांची तस्करी करणाऱ्यांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. नुकतीच जोगेश्वरीतून एका स्क्रिप्ट रायटरला बनावट पैशांच्या तस्करी प्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली.

बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या स्क्रिप्ट रायटरला अटक
SHARES

बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट रायटरला मुंबईच्या गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी अटक केली. देवकुमार पटेल (३७) असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ५ लाख ७८ हजार २०० रुपयाच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.

५ लाखांच्या नोटा  

देशात लोकसभा निवडणुकीनं राजकीय वातावरण तापलेलं असताना. बनावट नोटांची तस्करी करणाऱ्यांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. नुकतीच जोगेश्वरीतून एका स्क्रिप्ट रायटरला बनावट पैशांच्या तस्करी प्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली.

जोगेश्वरीच्या एस. व्ही. रोडवर अनोळखी व्यक्ती बनावट पैशांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हेे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला होता. त्या ठिकाणी देवकुमार पटेल हा संशयास्पद वावरत असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना त्याच्याजवळ तब्बल ७ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. हे पैसे त्यानं कुठून कसे आणले याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

नायगाव बीडीडीत स्लॅब कोसळून महिला जखमी

ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील पाण्याच्या टाकीत ५ कामगार पडले, एकाचा मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा