बहिणीची छेड काढल्याचे सांगून ते लुबाडायचे


बहिणीची छेड काढल्याचे सांगून ते लुबाडायचे
SHARES

आपल्या बहिणीची छेड का काढली असे विचारत नागरिकांना लुबाडणाऱ्या एका सराईत चोराला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. युसूफ सलीम सय्यद (22) असे या तरुणाचे नाव असून त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून गोरेगाव, वाकोला, सांताक्रूझ, मालाड तसेच मीरारोडमध्ये अशाच प्रकारे अनेकांना लुबाडल्याचा दावा वनराई पोलिसांनी केला आहे. असे संगितले जात आहे, रस्त्यातून एकट्या जाणाऱ्या तरुणांना ही टोळी हेरत आणि मग आडोशाला नेऊन त्यांना लुबाडले जाई.


धमकी देत 11 तोळ्यांची चैन पळवली

9 ऑगस्टला गोरेगाव येथून प्रशांत सावंत (24) नावाचा तरुण जात असताना युसूफ सलीम सय्यद आणि त्याच्या साथीदाराने त्याला अडवले. तू माझ्या बहिणीला का छेडले असे म्हणत हे दोघेही त्याला धमकाऊ लागले त्यानंतर त्याला आडोशाला नेऊन धमकी दिली आणि त्याच्या गळ्यातील 11 तोळ्यांची चेन घेऊन या दोघांनी पोबारा केला.


अखेर पोलिसांनी आरोपीला पकडले

या प्रकरणी घटनास्थळाच्या सीसीटीव्हीचे फुटेज वनराई पोलिसांनी तपासले. मात्र ती दृश्ये स्पष्ट नव्हती. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्यातील एक आरोपी हा घाटकोपर येथील बारमध्ये येणार असल्याची माहिती वनराई पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आरोपी युसूफला अटक केली. 23 तारखेपर्यंत हा युसूफ पोलिसांच्या ताब्यात असून सध्या पोलिस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.



हेही वाचा - 

मुलुंडमध्ये डान्सबारवर पोलिसांची धाड

दादरमध्ये बोगस पोलिसाला आरपीएफने पकडले


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा