दादरमध्ये बोगस पोलिसाला आरपीएफने पकडले


दादरमध्ये बोगस पोलिसाला आरपीएफने पकडले
SHARES

लोकल आणि मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करताना आपण पोलिस असल्याचे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सचिन सोनावणे (30) असे या आरोपीचे नाव आहे. हा सोनावणे पोलिस असल्याचा बनाव करून हावडा मेलमध्ये एसी डब्यात विनातिकीट प्रवास करत होता. पण ट्रेन दादर येथे पोहचात दक्ष तिकीट तपासणीसाने रोखल्याने त्याचे बिंग आरपीएफ पोलिसांसमोर फुटले.


सोनावणेने नक्की काय केले?

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक सहा येथे मंगळवारी हावडा मेल थांबली असता तिकीट तपासणीसांनी तपासणी सुरू केली. तेव्हा धनंजयकुमार यादव (30) या तिकीट तपासनीसांनी थर्ड एसीतील बोगी क्रमांक दोनमधून उतरलेल्या सोनावणे याच्याकडे तिकीट विचारले. त्यावेळी त्याने उर्मटपणे उत्तर देत पोलिस असल्याचे सांगितले. हा वाद चिघळत असतानाच तिथे ड्युटीवर असणाऱ्या आरपीएफच्या जवानांनी तिथे हस्तक्षेप केला.


कसा सापडला भामटा?

त्यानंतर तिकीट तपासणीस (टीसी) ने सोनावणेकडे ओळखपत्र मागितले असता त्याने विरोधाचा सूर दर्शवत घाईगडबडीने निसटण्याचा प्रयत्न केला. ते पाहून आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत आरपीएफच्या चौकीत नेले. त्याचे ओळखपत्र तपासले असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा आरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एपीआय वाजे यांनी त्याला अटक केली. सोनावणेकडे रेल्वे पोलिसांप्रमाणेच ठाणे ग्रामीण आणि मुंबई पोलिस विभागाचे बनावट ओळखपत्र असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती दादर आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश मेनन यांनी दिली.



हेही वाचा -

60 वर्षांचा तोतया 'टीसी' गजाआड

तोतया पोलिसांची घरात घुसून लूटमार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा