मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप


मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
SHARES

नेपाळी अभिनेत्री मीनाक्षी थापा हिच्या हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं अखेर दोघा आरोपींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी अमित जयस्वाल आणि त्याची मैत्रिणी प्रीती सुनरीन या दोघांनी खंडणीच्या उद्देशानं मीनाक्षीचं अपहरण केलं होतं. त्यानंतर तिची क्रुर हत्या केली होती. या दोघांवरील आरोप सिद्ध झाल्यानं या दोघांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


संपूर्ण प्रकार

2012 मध्ये अमित जयस्वाल आणि त्याची मैत्रीण प्रीती सुनरीन हिने मीनाक्षीला फसवून अलाहाबादला नेत तेथे तिची हत्या केली आणि तिचं शीर जंगलात तर धड सेफ्टीक टँकमध्ये टाकली. त्यानंतर या दोघांनी मीनाक्षी जिवंत असल्याचं भासवत तिच्या आई आणि वहिनींकडे 15 लाखांची खंडणी मागितली. हत्येपुर्वी मीनाक्षीकडून तिच्या डेबिट कार्डचा पासवर्ड मिळवत तिच्या खात्यातून 46 हजार रुपयेही या दोघा आरोपींनी काढून घेतलं होतं.
इतक्या नियोजनबद्ध आणि क्रुरपणे या दोघांनी मीनाक्षीचं अपहरण आणि खून केल्याचं गुरुवारच्या सुनावणीत सिद्ध झालं आहे.


दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणी आरोपींना कोणतीही दयामाया न दाखवता फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयानं या दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अमित जयस्वाल हा वकील तर प्रीती ही ज्युनिअर आर्टिस्ट आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा