धारावीत नाल्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

धारावीच्या राजीवनगर कुटुंबियांसोबत राहणार अमित सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास परिसरातील मुलांसोबत खाडीशेजारील निसर्ग उद्यानात आला होता. मित्रांसोबत खेळत असताना तो खाडीत पडला.

धारावीत नाल्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
SHARES

गोरेगाव येथे उघड्या गटारात पडलेल्या दिव्यांश सिंग याचा शोध लागलेला नसतानाच आता धारावीत एका सात वर्षाच्या चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमित जैसवार असं या मुलाचे नाव आहे. अमितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


खेळताना खाडीत पडला

धारावीच्या राजीवनगर  कुटुंबियांसोबत राहणार अमित  सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास परिसरातील मुलांसोबत खाडीशेजारील निसर्ग उद्यानात आला होता. मित्रांसोबत खेळत असताना तो नाल्यात पडला. ही बाब त्याच्या मित्रांनी स्थानिकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर स्थानिक अमितच्या मदतीसाठी धावून गेले. बेशुद्ध अवस्थेत अमितला खाडीतून बाहेर काढले. त्यालासायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषीत केले. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.हेही वाचा -

घाटकोपरमध्ये आॅनर किलींग, प्रेमविवाह केल्याने वडिलांनी केली मुलीची हत्या

लोकलमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन लुटले
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा