व्हायचं होतं नगरसेवक, डिझेल चोरीत झाली अटक

मुंबईतल्या एका प्रसिद्ध राजकीय पक्षातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला शिवडी पोलिसांनी नुकतीच डिझेल चोरी प्रकरणात अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल ५ हजार लिटरचा डिझेलचा साठा हस्तगत केला असून या गुन्ह्यात ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

व्हायचं होतं नगरसेवक, डिझेल चोरीत झाली अटक
SHARES

मुंबईतल्या एका प्रसिद्ध राजकीय पक्षातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला शिवडी पोलिसांनी नुकतीच डिझेल चोरी प्रकरणात अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल ५ हजार लिटरचा डिझेलचा साठा हस्तगत केला असून या गुन्ह्यात ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

काळ्या बाजारात डिझेलची विक्री

मुंबईच्या समुद्रातील जहाजांमधून एव्हर पाॅवर डिझेलची चोरी करून ते डिझेल काळ्या बाजारात कमी किंमतीत विकून लाखो रूपयांची उलाढाल करण्यात येत होती. याबाबतची माहिती पोलिस उपायुक्त (बंदरे) रश्मी करंदीकर यांना मिळाली होती. त्यानुसार समुद्रतटावरील पोलिस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करून डिझेलची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता.

कुणाला अटक?

या चोरीत पोलिसांंनी संतोष हेन्ड्री आलफेंन्ड डिसोजा (३२), राजेश हरिजन (३०), राकेश चव्हाण (३०), कालूराम गौतम (३१), शंभू ऊर्फ सुनील कोळी (३०) आणि शिपमधील मोटरमन सुमीत तिवारी यांना अटक केली. तिवारी आरोपींना मदत करत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली.

या टोळीतील मुख्य सूत्रधार हा संतोष डिसोझा असल्याचं तपासात पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रीत केलं आणि वेळ येताच त्याला ताब्यात घेतलं.

कोण आहे डिसोझा?

डिसोझावर या पूर्वी दोन मारामारीच्या गुन्ह्यासह तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. वडाळा पूर्व परिसरात राहणाऱ्या डिसोझाने कुख्यात गँगस्टर अरूण गवळीच्या आखिल भारतीय सेना या पक्षातून २०१७ मध्ये नगरसेवकपदी निवडणूक लढवली होती. दारूखानाच्या २०९ वॅार्डतून संतोष उभा राहिला होता. या टोळीचा अंडरवर्ल्डशी काही संबध आहे का? याचा पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा-

छोटा शकिलसह चार जणांवर मोक्का!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा