धक्कादायक ! पोलिस अधिकाऱ्यांच्याच नावाने विकत होता ड्रग्ज


धक्कादायक ! पोलिस अधिकाऱ्यांच्याच नावाने विकत होता ड्रग्ज
SHARES

मुंबईत सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज तस्करांचा सहभाग समोर आल्यानंतर मुंबईच्या अंमली पदार्थ विभाग आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने कारवाईचा धडका लावला आहे. वर्षभरात दोन्ही विभागाने मोठ मोठ्या कारवाया करत अनेक तस्करांना तुरुंगात धाडलं आहे.  मुंबई पोलिसांच्या अशाच एका कारवाई दरम्यान एक आरोपी चक्क पोलिस उपायुक्त अधिकाऱ्याच्या नावाने ड्रग्ज विकत असल्याची धक्कादायकबाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

हेही वाचाः- IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मलिंगासह 'या' खेळाडूंना सोडचिठ्ठी

दक्षिण मुंबईत मेफेड्राँन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपी कमरान जावेद शेखची माहिती अंमली पदार्थ विभागाच्या वरळी युनिटला मिळाली होती. हा तस्करतर चक्क एका पोलिस उपायुक्त अधिकाऱ्याच्या नावानेच ड्रग्ज विकत असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. कमरान जावेद शेख (३२) हा ड्रग्जच्या तस्करीसाठी दोन टाकी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. दरम्यान कमरान हा दोन टाकी परिसरात संशयास्पद रित्या फिरत असताना पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता. पोलिसांना त्याच्याजवळ ६० ग्रॅम मेफोड्राँन हे ड्रग्ज आढळून आले.

हेही वाचाः- संभाजी बिडीचं नाव बदललं, आता या नावानं ओळखली जाणार बिडी

पोलिस चौकशीत हा आरोपी ते ड्रग्ज मुंबई पोलिस दलातील एका पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नावाने विकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी त्याच्याजवळून जप्त केलेल्या ड्रग्जची बाजारात किंमत तब्बल ६ लाख रुपये इतकी आहे. या आरोपीवर कलम ८ (क) सह २२ (क) एनडीपीएस अँक्ट १९८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा